पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांची प्रकृती खालावली आहे. यानंतर त्यांना कार्ची येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. वृत्तसंस्था पीटीआयने मंगळवारी 'द एक्सप्रेस ट्रिब्यून'च्या हवाल्याने सांगितले की, 69 वर्षीय आसिफ अली झरदारी यांना ताप आणि संसर्गाची तक्रार होती. यामुळे त्यांना कराचीपासून सुमारे 300 किलोमीटर अंतरावर असलेल्या नवाबशाह येथून रुग्णालयात आणण्यात आले.