मठात आत्मघाती बॉम्बस्फोट, आठ अल्पवयीन मुलं जखमी, हल्लेखोर ठार

सोमवार, 13 डिसेंबर 2021 (19:44 IST)
रशियाची राजधानी मॉस्कोजवळील एका मठावर झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात सात तरुण जखमी झाले असून हल्लेखोर ठार झाला आहे. सकाळी आठच्या सुमारास हा हल्ला झाला.मठातील स्फोटक यंत्राचा अचानक स्फोट झाल्याने जखमींमध्ये एका पंधरा वर्षीय तरुणाचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. हल्लेखोर जवळच्या कॉन्व्हेंट शाळेचा विद्यार्थी होता.
मॉस्को क्षेत्राच्या अभियोजक कार्यालयाने एका निवेदनात या घटनेची पुष्टी करत म्हटले आहे की जखमींमध्ये सर्व अल्पवयीन मुलांचा समावेश आहे, या मध्ये  एका 15 वर्षांच्या किशोरवयीन मुलाचा समावेश आहे. प्रादेशिक पोलिस विभागाच्या जवळच्या सूत्राने सांगितले की, बॉम्बस्फोटा प्रकरणी एका मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहे. हा मुलगा सुद्धा कॉन्व्हेंट शाळेतला आहे.
मॉस्कोजवळील वेवेदेंस्की व्लाचिन येथील मठात हा तीव्र स्फोट झाल्याचे अहवालात म्हटले आहे. हा स्फोट एवढा जोरदार होता की मठाच्या मोठ्या भागाचेही नुकसान झाले आणि तेथील सर्वजण गंभीर जखमी झाले. याशिवाय आजूबाजूला काही अंतरावर उपस्थित असलेले लोक भीतीने इकडे-तिकडे धावू लागले. माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले.
सकाळच्या प्रार्थनेच्या वेळी तेथे लोक जमा होत असताना हल्लेखोराने हा कट रचल्याचेही वृत्त आहे. मात्र, हल्ल्याच्या नियोजना दरम्यान तो प्रवेशद्वाराजवळ पोहोचताच तेथे बॉम्बस्फोट झाला, त्यानंतर गोंधळ उडाला. घटनास्थळी पोहोचलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी   जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या या घटनेच्या अधिकृत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती