माउंट एव्हरेस्ट चढून जाणारी पहिली महिला जुन्को ताबेई यांचे निधन

सोमवार, 24 ऑक्टोबर 2016 (16:49 IST)
जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट चढून जाणारी पहिली महिला जुन्को ताबेई यांचे निधन झाले. त्या ७७ वर्षांच्या होत्या. जपानच्या प्रख्यात गिर्यारोहक असलेल्या ताबेईंनी मे १९७५मध्ये एव्हरेस्ट सर केले होते. त्यावेळी त्यांचे वय ३५ वर्षे होते. १९९२पर्यंत त्यांनी जगातील सर्वांत उंच सात शिखरेही गाठली. मागील काही दिवसांपासून ताबेई जठराच्या कर्करोगाने आजारी होत्या. ६पेक्षा जास्त देशांमध्ये गिर्यारोहण केले आहे. चार वर्षांपूर्वी त्यांना कर्करोग झाल्याचे समोर आले, मात्र त्यांनी गिर्यारोहण बंद केले नाही.

वेबदुनिया वर वाचा