इटलीची राजधानी रोमच्या बाहेरील एका रुग्णालयात लागलेल्या आगीत चार जणांचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाल्याची माहिती आहे. तिवोली येथील रुग्णालयात आग लागल्यानंतर जवळपास 200 रुग्णांना बाहेर काढण्यात आले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शुक्रवारी रात्री (स्थानिक वेळेनुसार) रात्री 11 वाजण्याच्या सुमारास हॉस्पिटलच्या इमारतीच्या तळमजल्यावरील आपत्कालीन कक्षात आग लागली आणि काही वेळातच ती इमारतीच्या इतर भागात पसरली. यानंतर संपूर्ण इमारत धुराने भरून गेली.
आग लागल्यानंतर रुग्णालयातून बाहेर काढण्यात आलेल्यांमध्ये 193 रुग्णांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये एक गर्भवती महिला आणि अनेक लहान मुलांचाही समावेश आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, यापैकी काही रुग्णांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांना तातडीने रुग्णवाहिकांमधून इतर रुग्णालयात हलवण्यात आले आहे.सध्या आगीचे कारण समजू शकलेले नाही. इटालियन अधिकाऱ्यांनी या घटनेची चौकशी सुरू केली आहे. इटलीच्यापंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला