इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला आहे. यासंदर्भातील वृत्त सरकारी टीव्हीने दिले आहे.
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी, परराष्ट्र मंत्री आणि इतर अधिकाऱ्यांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर देशाच्या वायव्य भागात डोंगराळ भागात कोसळला. या नंतर बचाव कार्य सुरु केले. या हेलिकॉप्टरमध्ये कोणीही जीवित नसल्याचे वृत्त मिळत आहे. अपघातग्रस्त हेलिकॉप्टरचा अवशेष सापडला आहे.
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी 63 वर्षांचे होते आणि ते कट्टरपंथी नेते म्हणून ओळखले जात होते. त्यांनी यापूर्वी देशाच्या न्यायव्यवस्थेचे नेतृत्व केले होते. रायसी यांना इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या जवळचे मानले जाते.
रायसी यांनी इराणच्या 2021 च्या अध्यक्षीय निवडणुकीत विजय मिळवला होता.