अमेरिकेत एक अपघात झाला आहे, जिथे आकाशातच हेलिकॉप्टर आणि विमान एकमेकांशी धडकले.आरिझोनाच्या फिनिक्स विमानतळाजवळ उड्डाणा दरम्यान हेलिकॉप्टर आणि लहान विमान यांच्यात धडक झाल्यानंतर हेलिकॉप्टर एका शेतात कोसळले, ज्यात बसलेल्या दोघांचा मृत्यू झाला. या धडक झाल्या नंतर विमान सुरक्षितपणे उतरले आणि फ्लाइट इन्स्ट्रक्टर आणि प्रशिक्षणार्थी पायलट जखमी झाले नाहीत.
पोलिस सार्जंट जेसन मॅक्लेमन्स यांनी सांगितले की, शुक्रवारी चॅंडलर शहरात हा अपघात झाला. ते म्हणाले की जमिनीवर कोणीही जखमी झाले नाही परंतु अनेक तास विमानतळ बंद राहिले. चँडलरच्या अग्निशमन विभागाला सकाळी 8 वाजता विमानतळाजवळ अपघाताची माहिती मिळाली. अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले की, अपघातानंतर हेलिकॉप्टरला आग लागली पण काही वेळातच ती आटोक्यात आली.
अग्निशमन दलाच्या जवानांनी ढिगाऱ्यातून दोन मृतदेह बाहेर काढले. मॅरिकोपा काउंटीचे वैद्यकीय तपासणी कार्यालय दोन्ही मृतदेहांची ओळख पटवेल. चँडलर पोलिसांच्या मॅक्लेमन्सच्या मते, हे हेलिकॉप्टर क्वांटम हेलिकॉप्टरद्वारे चालवले जात होते आणि विमान फ्लाइट ऑपरेशन्स अकादमीद्वारे चालवले जात होते. दोन्ही उड्डाण प्रशिक्षण शाळा आहेत. फ्लाइट ऑपरेशन्स अकॅडमीचे मालक रिचर्ड बेंगोवा म्हणाले की, चार आसनी विमानांचा वापर उड्डाणाच्या प्रशिक्षणासाठी केला जातो. घटनेच्या वेळी विमानात फक्त दोनच लोक होते. राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळ अपघाताचे कारण तपासणार आहे.