आईनस्टाईनच्या चिठ्ठीला 35 लाख रूपयांची बोली

जगातील अनेक प्रसिद्ध शास्त्रज्ञांमध्ये जर्मन शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन यांचाही प्रामुख्याने समावेश करावा लागेल. त्यांनी लिहिलेल्या एका चिठ्ठीचा नुकताच लिलाव करण्यात आला. 
 
यामध्ये या चिठ्ठीला तब्बल 53, 503 डॉलर्सची (35 लाख रुपये) बोली लागली. शास्त्रज्ञ आईनस्टाईन यांनी ही चिठ्ठी 1953 साली लिहिली होती. एका जर्मन शिक्षकाच्या प्रश्‍नावलीला उत्तर देताना आईनस्टाईन यांनी ही चिठ्ठी लिहिली होती. 
 
आयोवा येथील सायन्स विषयाचे शिक्षक आर्थर कव्हर्स यांनी आईनस्टाईन यांना दोन पानांची प्रश्‍नावली पाठवली होती. यामध्ये इलेक्ट्रोस्टेटिक थिएरी आणि स्पेशल रिलेटिव्हिटीसंदर्भात प्रश्‍नांचा समावेश होता. या प्रश्‍नावलीच्या उत्तरादाखल लिहिलेल्या चिठ्ठीच्या बोलीस 15 हजार डॉलर्सने (सुमारे 9.75 लाख रुपये) सुरुवात झाली. आर्थर कव्हर्स यांनी आईनस्टाईन यांना ही प्रश्‍नावली न्यू जर्सी येथील प्रिन्स्टनस्थित इन्स्टिट्यूट फॉर अ‍ॅडव्हान्सड स्टडीमधील रूम नंबर 115 मधून 7 नोव्हेंबर 1953 रोजी पाठवली होती. 
 
आईनस्टाईन यांनी उत्तरादाखल पाठवलेली चिठ्ठी अनेक वर्षे ऑर्थर कव्हर्स यांच्या नातेवाइकांकडेच होती, अशी माहिती आईनस्टाईन यांच्या चिठ्ठीचा लिलाव करणार्‍या ‘नेट डी सँडर्स ऑक्शन’च्या प्रवक्त्याने सांगितले.

वेबदुनिया वर वाचा