जपान अब्जाधीशाबरोबर आठ कलाकारही चंद्राची सैर

बुधवार, 19 सप्टेंबर 2018 (09:12 IST)
एका जपानी अब्जाधीशाने चंद्रावर फिरण्यासाठी अमेरिकेच्या स्पेस एक्स या कंपनीशी करार केला आहे. युसाकू मायजावा (४२) असे त्याचे नाव आहे. या अब्जाधीशाबरोबर आठ कलाकारही चंद्राची सैर करणार आहेत. स्पेसएक्स बिग फाल्कन रॉकेटमधून या सगळयांना चंद्रावर पाठवण्यात येणार आहे. 
 
२०२३ साला पर्यंत स्पेसएक्स रॉकेटमधून चंद्रावर फिरायला जाणारे ते पहिलेच सामान्य व्यक्ती असणार आहेत.  १९७२ मध्ये अमेरिकेच्या अपोलो मिशन नंतर मायजावा हे चंद्रावर जाणारे पहिले प्रवासी असणार आहेत. या चांद्र सफरीसाठी त्यांनी कंपनीला नेमकी किती रक्कम दिली ते मात्र गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. ‘माझे चंद्रावर प्रेम आहे. मला लहानपणापासून चंद्रावर फिरायला जाण्याची इच्छा होती. माझ्या आयुष्याचं ते स्वप्न आहे. माझ्या बरोबर मी जगातील ८ कलाकारांनाही सोबत नेणार आहे’. असे मायजावा यांनी सांगितले आहे. दरम्यान, चंद्रावरून आल्यानंतर सर्वजणांना कलाकृतीतून आपले अनुभव सांगावे लागणार आहे. असेही त्यांनी म्हटले आहे.
 
मायजावा जपानमधील सर्वात मोठ्या ऑनलाईन फॅशन मॉलचे प्रमुख आहेत. जपानमधील १८ धनाढ्य व्यक्तींच्या यादीत त्यांचा समावेश आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती