काबुलमध्ये २ बॉम्बस्फोट, २० ठार

गुरूवार, 6 सप्टेंबर 2018 (09:14 IST)
अफगाणिस्तानच्या काबुलमध्ये  झालेल्या बॉम्बस्फोटाच्या दोन घटनांमध्ये २० जण ठार झाले आहेत. तर चार पत्रकारांसह १२ जण जखमी झाले आहेत. स्पोर्ट्स क्लबच्या आतमध्ये एक स्फोट झाला आणि त्यानंतर काही वेळाने स्पोर्ट्स क्लबच्या बाहेर दुसरा स्फोट झाला आहे. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतलेली नाही. पहिला स्फोट झाल्यावर या ठिकाणी बचावकार्य सुरू करण्यात आले होते. ज्यानंतर काही वेळातच दुसरा स्फोट झाला अशीही माहिती समोर येते आहे. स्फोटाची पहिली घटना समोर आली तेव्हाच या ठिकाणी वार्तांकन करण्यासाठी काही प्रसारमाध्यमांचे काही प्रतिनिधी आले होते. या घटनेचे वार्तांकन करत होते तेव्हाच दुसरा स्फोट झाला त्यामुळे प्रतिनिधी आणि त्यांच्यासोबत असलेले कॅमेरामनही जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती