दहीहंडीच्या दिवशी मुलींबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राम कदम यांनी अखेर दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यांचा एक मराठीतला आणि एक हिंदीतला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हिंदीतल्या व्हिडिओत त्यांनी तमाम माता भगिनींचा सन्मान करतो आहे असे म्हणत ‘क्षमा’मागितली आहे. तर मराठीतल्या व्हिडिओत दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र आपल्या वक्तव्यात 'माफी' हा शब्द त्यांनी कुठेही येऊ दिलेला नाही.