डोनाल्ड ट्रम्प दोन वर्षांच्या बंदीनंतर फेसबुक-इन्स्टाग्रामवर परत येण्याची मेटाची घोषणा

शनिवार, 28 जानेवारी 2023 (09:39 IST)
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा फेसबुक आणि इंस्टाग्रामवर आपल्या प्रतिक्रिया देताना दिसणार आहेत. येत्या आठवड्यात ट्रम्प यांची फेसबुक आणि इंस्टाग्राम खाती पुनर्संचयित केली जातील, अशी घोषणा मेटाने केली आहे.
कॅपिटल हिल दंगलीनंतर 6 जानेवारी रोजी मेटाने अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे खाते निलंबित केले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोशल मीडिया कंपनीने एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की, वादग्रस्त पोस्ट टाळण्यासाठी नवीन नियम बनवले आहेत. फेसबुक आणि इन्स्टाग्राम हे राजकीय पोहोच आणि निधी उभारणीचे प्रमुख साधन असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
 
6 जानेवारी 2021 रोजी अमेरिकन संसदेवर झालेल्या हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फेसबुकने बंदी घातली होती. खरं तर, डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या पोस्टमध्ये दावा केला आहे की 2020 च्या अध्यक्षीय निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदानात हेराफेरी झाली होती. त्यानंतरच फेसबुकने डोनाल्ड ट्रम्प यांच्या अकाऊंटवर हिंसा भडकावल्याच्या आरोपावरून बंदी घातली होती. ट्विटरनेही डोनाल्ड ट्रम्पवर बंदी घातली आहे. मात्र, इलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे खाते पुन्हा सुरू करण्यात आले.
 
Edited By- Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती