मोठी बातमी ! दहशवादी फंडिंग प्रकरणात हाफिज सईदची निर्दोष मुक्तता

रविवार, 7 नोव्हेंबर 2021 (17:26 IST)
मुंबई हल्ला मास्टरमाईंड दहशतवादी हाफिज सईद याला पाकिस्तान न्यायालया पासून दिलासा मिळाला आहे . पाकिस्तानच्या लाहोर उच्च न्यायालयाने शनिवारी एका कनिष्ठ न्यायालयाचा निर्णयाला अमान्य करत हाफिज सईदच्या जमात-उद-दावा या प्रतिबंधित संघटनेच्या सहा दहशतवाद्यांना टेरर फाइनेंसिंग प्रकरणात निर्दोष मुक्त केले.
वृत्तानुसार, दहशतवाद्यांवर मोठी कारवाई करण्याचा  पाकिस्तान सरकारचा दावा पुन्हा एकदा खोटा ठरला. लाहोर हायकोर्टाने मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिद सईद आणि त्याच्या सहा साथीदारांना दहशतवादी वित्तपुरवठा केल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्त केले.
 
मुख्य न्यायमूर्ती मुहम्मद अमीर भाटी आणि न्यायमूर्ती तारिक सलीम शेख यांचा समावेश असलेल्या लाहोर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने शनिवारी सीटीडीच्या एफआयआर 18 मधील सहा जेयूडी नेत्यांविरुद्ध ट्रायल कोर्टाचा निर्णय रद्द केला, कारण फिर्यादी अपीलकर्त्यांवरील आरोप सिद्ध करण्यात अपयशी ठरले आहे.
 
हाफिज सईदविरोधातील हा खटला दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी सुरू होता  कनिष्ठ कोर्टाने या नेत्यांना दहशतवादाला आर्थिक मदत केल्याप्रकरणी दोषी ठरवले होते. ते लष्कर-ए-तैयबाला बेकायदेशीरपणे निधी पुरवत होते. दहशतवादाला वित्तपुरवठा करून जमा केलेल्या पैशातून मिळविलेल्या मालमत्ता जप्त करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले होते.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती