नेपाळ : पतंजलीची सहा वैद्यकीय उत्पादने अनुत्तीर्ण

शुक्रवार, 23 जून 2017 (07:37 IST)

नेपाळमध्ये पतंजली आयुर्वेदची सहा वैद्यकीय उत्पादने प्रयोगशाळेतील चाचणी अनुत्तीर्ण झाले आहेत. गुणवत्ता चाचणीत अनुत्तीर्ण  झाल्यानंतर नेपाळ सरकारने पतंजली उत्पादनांची विक्री त्वरीत थांबवली आहे. नेपाळच्या आरोग्य मंत्रालयाने पतंजलीला आपली सहा उत्पादने माघारी घेण्यास सांगितले आहे. तर दुसरीकडे सरकारनेही देशभरातील दुकानदारांना ही उत्पादने न विकण्याचे अपील केले आहे. चाचणीत अनुत्तीर्ण झालेल्या सहा वैद्यकीय उत्पादनांमध्ये दिव्य गाशर चूर्ण, बाहुची चूर्ण, आवळा चूर्ण, त्रिफला चूर्ण, अदविया चूर्ण आणि अस्वानगंधाचा समावेश आहे.  पतंजली आवला चूर्ण बॅच क्रमांक AMC067, दिव्य गाशर चूर्ण बॅच क्रमांक A-GHCI31, बाहुची चूर्ण बॅच क्रमांक BKC 011, त्रिफाला चूर्ण बॅच क्रमांक A-TPC151, अस्वानगंधा बॅच क्रमांक AGC 081, अदविया चूर्ण बॅच क्रमांक DYC 059 हे मायक्रोबिएल चाचणीत अपयशी ठरले. 

वेबदुनिया वर वाचा