मिळालेल्या माहितीनुसार आज शनिवारी ५.८ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने पाकिस्तानची जमीन हादरली. जमीन हादरल्याचे जाणवल्याने लोक घराबाहेर पळू लागले. काही वेळातच रस्त्यावर मोठ्या संख्येने लोक जमले. राष्ट्रीय भूकंप केंद्राच्या म्हणण्यानुसार, दुपारी १ वाजता हा भूकंप झाला. त्याचे केंद्र जमिनीपासून १० किलोमीटर खोलीवर होते. अजून कोणत्याही प्रकारच्या नुकसानीची माहिती नाही.