अल जझीराच्या वृत्तानुसार, पाकिस्तानी सैन्याने अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या खैबर पख्तूनख्वा आणि डेरा इस्माईल खान जिल्ह्यात छापे टाकले. पोलिसांनी सांगितले की, हे दहशतवादी तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) शी संबंधित होते. शनिवारी, अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या वायव्य पाकिस्तानातील कुर्रम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर हल्ला केला, असे पोलिसांनी सांगितले. या हल्ल्यात कोणत्याही जीवितहानीबद्दल अद्याप पुष्टी झालेली नाही.
तत्पूर्वी, टीटीपीच्या एका गटाने वायव्य पाकिस्तानातील बन्नू येथील लष्करी छावणीच्या सीमा भिंतीवर स्फोटकांनी भरलेली दोन वाहने आदळवली. 4 मार्च रोजी झालेल्या या आत्मघातकी हल्ल्यात 12 जणांचा मृत्यू झाला होता आणि 30 जण जखमी झाले होते. लष्कराच्या जवानांनी किमान सहा दहशतवाद्यांना ठार मारले.