पापुआ न्यू गिनीमध्ये गेल्या काही महिन्यांत हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत.
आता पुन्हा एकदा आदिवासी हिंसाचारात 53 जणांचा गोळ्या झाडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
वृत्तानुसार, दक्षिण पॅसिफिक बेट राष्ट्राच्या दुर्गम डोंगराळ प्रदेशातील एन्गा प्रांतात हा हल्ला झाला. यामुळे 53 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे.
पापुआ न्यू गिनी कॉन्स्टेब्युलरीचे कार्यवाहक अधीक्षक जॉर्ज म्हणाले की, जंगलात पळून गेलेल्या जखमींचे मृतदेह पोलिसांना सापडले. याशिवाय रस्ते आणि नदीकाठून मृतदेह गोळा करण्यात आले आहेत. हे मृतदेह ट्रकमध्ये भरून रुग्णालयात नेण्यात आले. अधिकारी अजूनही गोळ्या घालून जखमी झालेल्यांची मोजणी करत आहेत.
पापुआ न्यू गिनी विकसनशील देशांमध्ये गणले जाते. येथे मोठ्या प्रमाणात आदिवासी जातीचे लोक राहतात. 800 पेक्षा जास्त भाषा बोलल्या जातात. यापूर्वी जानेवारी महिन्यातही येथे हिंसाचार उसळला होता, ज्यामध्ये 16 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पंतप्रधानांनी देशात आणीबाणी जाहीर केली होती. यासोबतच त्यांनी अनेक सरकारी पोलिसांचे निलंबनही केले होते.