2030 पर्यंत कर्बवायू उत्सर्जनात घट करू : भारत

शनिवार, 3 ऑक्टोबर 2015 (08:44 IST)
बर्लिन- हवामान बदलासंदर्भात संयुक्त राष्ट्रसंघाच्या येत्या डिसेंबर महिन्यात पॅरिस येथे होणार्‍या परिषदेच्या पाश्र्वभूमीवर भारताने देशातील कर्बवायू उत्सर्जनामध्ये 2030 पर्यंत 33-35 टक्क्यांची घट करण्याचे आश्वासन दिले. भारत हा जगामधील तिसरा सर्वात मोठा कर्बवायू उत्सर्जक देश मानला जातो.
 
2030 पर्यंत देशातील 40 टक्के वीजनिर्मिती अपारंपरिक ऊर्जासाधनांच्या साहाय्याने करण्याचेही भारताने मान्य केले आहे. मात्र अर्थात, यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाची आर्थिक मदत आवश्यक असल्याचेही भारताने स्पष्ट केले आहे. 
 
जगामधील सर्वात मोठा कर्बवायू उत्सर्जक देश असलेल्या चीनने 2030 पर्यंत कर्बवायू उत्सर्जन 60-65 टक्क्यांनी कमी करण्याचे आश्वासन दिले आहे.

वेबदुनिया वर वाचा