दक्षिण चीनमधील एका नदीत एक जहाज आणि बोटीची जोरदार टक्कर झाली आहे. या घटनेत अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, जहाजातून तेल गळतीमुळे जलचरांना धोका वाढला आहे. तेल गळती साफ करणारे जहाज एका लहान बोटीला धडकले, ज्यामुळे 11जणांचा मृत्यू झाला आणि पाच जण बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे. ज्यांचा शोध घेतला जात आहे. सरकारी माध्यमांनी शुक्रवारी रात्री ही माहिती दिली.