अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत अब्जाधीश उद्योगपती एलोन मस्क यांनीही भाग घेतला आहे. एलोन मस्क हे सरकारी कार्यक्षमता विभागाचे प्रमुख आहेत आणि त्यांच्या धोरणांमुळे त्यांना खूप विरोध होत आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत, जेव्हा ट्रम्प यांनी मस्क यांना त्यांच्या योजनांबद्दल सांगण्यास सांगितले तेव्हा त्यांनी खुलासा केला की, 'मला सतत जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत.'
यादरम्यान, एलोन मस्कने गंमतीने स्वतःला सरकारी टेक सपोर्ट म्हटले. ते म्हणाले की, अनेक सरकारी व्यवस्था खूप जुन्या आहेत, ज्यामध्ये सुधारणा केल्या जात आहेत. 'आमचे मुख्य ध्येय अमेरिकेची वाढती तूट कमी करणे आहे.' जर आपण आताच कारवाई केली नाही तर देश दिवाळखोरीत जाऊ शकतो
एका आकडेवारीनुसार, आतापर्यंत सुमारे एक लाख सरकारी कर्मचाऱ्यांना एकतर काढून टाकण्यात आले आहे किंवा त्यांनी स्वेच्छेने राजीनामा दिला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांची सर्वात मोठी संघटना असलेल्या अमेरिकन फेडरेशन ऑफ गव्हर्नमेंट एम्प्लॉईजने मस्कच्या धोरणांना बेकायदेशीर आणि धोकादायक म्हटले आहे आणि कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.