राष्ट्राध्यक्षांचं भाषण ऐकून ऑफिसमध्ये निर्वस्त्र झाले!

भारतात प्रत्येक दोन तीन वाक्यादरम्यान मुहावरे वापरले जातात. परंतू प्रत्येकाचा शब्दश: चा अर्थ लावणे योग्य नाही. मुहावर्‍याचे आपला वेगळा अर्थ असतो. परंतू कधीकधी मुहावर्‍याचा अर्थ समजून न घेता त्याचा अर्थ लावण्याने विचित्र चित्र समोर येतं. बेलारूस येथे अशीच घटना घडली, जेव्हा राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर यांचे भाषण ऐकून लोकांनी ऑफिसमध्येच कपडे काढायला सुरुवात केली.
अलीकडे अलेक्झांडर यांनी मिन्स्क येथे नॅशनल असेंब्ली मध्ये भाषण देताना जीव तोड मेहनत करण्याचा सल्ला दिला होता. यासाठी त्यांनी to strip and work मुहावरा वापरला होता. येथील लोकांनी हा मुहावरा शब्दश: घेतला आणि ऑफिसात निर्वस्त्र होऊन काम करायला लागले.
 
यानंतर बेलारूसवासी निर्वस्त्र फोटो सोशल मीडियावर पोस्ट करू लागले. आणखीतर काही लोकांनी हा संदेश वापरून गीत रिकॉर्ड केले जे हॅशटॅग बेलारूस या नावाने जाहीर केले गेले. सध्या जगभरात हे फोटो व्हायरल होत आहे. तसेच काही लोकांचे म्हणणे आहे की अलेक्झांडर यांनी भावनात्मक अपील म्हणून असे शब्द निवडले होते.

वेबदुनिया वर वाचा