मोदी पाक व मुस्लीमविरोधी : परवेझ मुशर्रफ

गुरूवार, 28 ऑगस्ट 2014 (12:43 IST)
पाकिस्तानने पुन्हा एकदा काश्मीरचा राग आळवला आहे. जोपर्यंत काश्मीर मुद्दय़ावर चर्चा होत नाही तोपर्यंत भारताशी बातचीत शक्य नसल्याचे, पाकिस्तान सरकारच्या माहिती विभागाने म्हटले आहे. दुसरीकडे, पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती निवृत्त जनरल परवेझ मुशर्रफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. मोदी मुस्लीमविरोधी आहेत आणि त्यांचे धोरण पाकिस्तानविरोधी असल्याचे मुशर्रफ म्हणाले.
 
गेल्या काही दिवसांपासून भारत-पाकिस्तान संबंध बिघडले आहे. गेल्या 15 दिवसांमध्ये पाकिस्तानकडून अनेकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले आहे. 1971 नंतर झालेली ही सर्वात मोठा गोळीबार असल्याचे म्हटले जाते. तर, पाकिस्तानच्या उच्चयुक्तांनी भारताच्या विरोधानंतरही बंडखोर नेत्यांची भेट घेतली. त्यामुळे भारत सरकारने दोन्ही देशांदरम्यान नियोजित परराष्ट्र सचिवस्तरीय बैठक रद्द केली.
 
मोदी मुस्लीमविरोधी
 
मुशर्रफ यांनी पाकिस्तानी चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले, ‘मी मोदी साहेबांबद्दल काही बोलू इच्छितो. आपल्याला त्यांच्या सरकारच्या कामकाजावर लक्ष ठेवण्याची गरज आहे. जेव्हा तुम्ही मोदी साहेबांना मुळातून समजून घ्याल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की ते मुस्लीमविरोधी आणि पाकिस्तानविरोधी आहेत. यात काहीही शंका नाही.’ 

वेबदुनिया वर वाचा