मदत पथकांनो मागे फिरा : नेपाळ सरकार

मंगळवार, 5 मे 2015 (10:05 IST)
नेपाळमधील भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी भारतासह विविध देशांतून आलेल्या मदतपथकांना मायदेशी परतण्याचे आदेश नेपाळ सरकारने दिले आहेत.
 
उर्वरीत मदतकार्य नेपाळ सरकार करेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यापासून जवळपास २५ देशांची मदतपथके नेपाळमध्ये कार्यरत आहेत. मृत आणि जखमींना ढिगार्‍याबाहेर काढण्याचे काम जवळजवळ संपले असून आता शिल्लक राहिलेले ढिगारे उपसण्याचे काम आमची यंत्रणा करेल, असे नेपाळ सरकारने स्पष्ट केले आहे. दरम्यान, या आदेशामुळे एनडीआरएफची टीम परतणार आहे.
 
पुनर्वसनासाठी मात्र, नेपाळनेच आवाहन केले असल्याने भारतीय सैन्याची अभियांत्रिकी टीम नेपाळमध्ये जाणार आहे.

वेबदुनिया वर वाचा