बुधग्रहावर बर्फाचे ‍अस्तित्व!

WD
आपल्या ग्रहमालिकेतील सर्वात छोटा आणि सूर्यापासून सर्वात जवळ असलेला ग्रह म्हणजे बुध. सूयापासून अत्यंत कमी अंतरावर असूनही या ग्रहावरील एका विवरात चक्क बर्फाचे तसेच विशिष्ट अशा ऑर्गेनिक पदार्थांचे अस्तित्व असल्याचे निष्पन्न झाले आहे. बुधावरील बर्फ हा पाण्याचाच आहे हे विशेष! या संशोधनामुळे खगोलशास्त्रज्ञांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था 'नासा'ने याबाबतचे संशोधन केले आहे. बुधाच्या उत्तर ध्रुवावरीलएका विवरात बर्फ आणि ऑर्गेनिक पदार्थ असल्याचे नासाच्या संशोधकांना आढळले. बुधाचे रहस्य उलगडण्यासाठी गेलेल्या 'मेसेंजर' या यानाने हे निरीक्षण केले आहे.

वेबदुनिया वर वाचा