फेसबुकच्या मार्क झुकेरबर्गचे शुभमंगल

फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग शनिवारी आपल्या २७ वर्षीय प्रेयसीसोबत विवाहबंधनात अडकले. तिचे नांव प्रिसिला चान असून मार्कच्या कॅलिफोर्निया येथील घरी साध्या समारंभात हा विवाहसोहळा पार पडला.

PTI
PTI
मार्क ने फेसबुक टाइमलाइनवर याबाबत अपडेट केले आहे. समारंभास शंभरेक पाहुणे उपस्थित होते. सोहळ्यासाठी मार्कने गडद नीळ्या रंगाचा सूट, पांढरे शर्ट व टाई परिधान केला होता. चान हिने ‍स्लीवलेस वेडिंग गाउन घातला होता. मार्क ने हा फोटो पोस्ट केल्यानंतर अवघ्या ३० मिनिटात १,३१,००० लोकांनी आपली पसंती दर्शवली.

या जोडप्याची भेट हावर्ड विद्यापीठात झाली होती. भेटीचे रूपांतर प्रेमात झाले आणि गेल्या नऊ वर्षापासून ते सोबत होते.

वेबदुनिया वर वाचा