पाकिस्तानला दहशतवादी देश जाहीर करण्याच्या तयारीत अमेरिका

बुधवार, 21 सप्टेंबर 2016 (12:55 IST)
अमेरिकने पाकिस्तानला दहशतवाद पसरवणारा देश जाहीर करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी दोन अमेरिकन खासदारांनी अमेरिकन काँग्रेसमध्ये पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करण्यासाठी विधेयक मांडले आहे. जर हे विधेयक अमेरिकन सांसदमध्ये पास झाले तर पाकिस्तानला मिळणारी वित्तीय मदतीवर देखील गाज पडू शकते.  
 
अमेरिकन काँग्रेसमध्ये दोन खासदारांनी पाकिस्तानला दहशत प्रायोजित करणारा देश घोषित करणारा विधेयक सादर केला आहे. हे विधेयक अशा वेळेस सादर करण्यात आले आहे जेव्हा संयुक्त राष्ट्राच्या महासभेत पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना दहशतवादावर बोलायचे आहे. जर हे विधेयक पास झाले तर पाकिस्तानसाठी फारच अडचण येऊ शकते. त्याला मिळणारी सर्व प्रकारची वित्तीय मदत रोखण्यात येईल.  
 
90 दिवसांमध्ये निर्णय घेईल अमेरिकन सरकार
पाकिस्तान स्टेट स्पॉन्सर ऑफ टेररिज्म डेजिगनेटेड एक्ट नावाने सादर करण्यात आलेल्या या विधेयकावर अमेरिकन प्रशासनाला चार महिन्याच्या आत विचार करावा लागणार आहे. हेच नव्हे तर या विधेयकावर राष्ट्रपती बराक ओबामा यांना देखील 90 दिवसांमध्ये या बाबत विस्तारात रिपेार्ट सादर करावी लागणार आहे. यात हे देखील सांगावे लागणार आहे की पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय दहशतवादाला दुजोरा दिला किंवा नाही.  
 
30 दिवसात ठेवण्यात येईल रिपेार्ट
30 दिवसानंतर एक फॉलोअप रिपेार्ट सांसदमध्ये सादर करण्यात येईल ज्यात सांगण्यात येईल की पाकिस्तानला दहशतवाद राष्ट्र जाहीर केले पाहिजे आणि जर नाही तर त्याचे काय कारण असतील. हे देखील समजावे लागणार आहे की कुठल्या कारणांमुळे वैधानिकरीत्या पाकिस्तानला या प्रकारे घोषित केले जाऊ शकत नाही. या विधेयकाला अमेरिकन संसद टेक्सासहून टेड पो आणि कॅलिफोर्नियाहून डाना रोहराबाचर यांनी सादर केले. टेड पो दहशतवादाबद्दल बनलेल्या एका समितीचे अध्यक्ष आहे.  
 
पाकिस्तानच्या विरुद्ध बरेच पुरावे  
पो यांनी विधेयकाची घोषणा करताना म्हटले आहे की या गोष्टीचे बरेच प्रमाण आहे की पाकिस्तानातच नव्हे तर पाकिस्तान सरकारने  देखील बर्‍याच वर्षांपासून अमेरिकन शत्रूंचे समर्थन केले. ओसामा बिन लादेनची तेथे उपस्थिती पासून हक्कानी नेटवर्कपर्यंतची तेथे उपस्थितीसारखे बरेच पुरावे आहे की पाकिस्तान दहशतच्या विरोधात लढाईत कोणाच्या अनुरूप आहे.

वेबदुनिया वर वाचा