नेपाळच्या पंतप्रधानांचा ऑगस्टमध्ये पदत्याग!

वेबदुनिया

बुधवार, 3 ऑगस्ट 2011 (14:46 IST)
नेपाळी कॉंग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षातील हुकूमशाही वृत्तीच्या नेत्यांच्या दबावामुळे, नेपाळचे पंतप्रधान झालानाथ खनाल 13 ऑगस्ट रोजी पदत्याग करणार आहेत.

नेपाळमध्ये पंतप्रधानपदासाठी निवडणुकीच्या 16 फेऱ्या झाल्या. माओवादी नेते प्रचंड यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर 17 व्या वेळी झालेल्या निवडणुकीत झालानाथ खनाल यांची पंतप्रधानपदी निवड झाली होती. तीन फेब्रुवारीला त्यांनी पदग्रहण केले होते. देशात शांतता प्रक्रिया सुरू करावी आणि मंत्रिमंडळात फेरबदल करावेत, असा दबाव माओवाद्यांनी त्यांच्यावर आणला आहे. या पार्श्‍वभूमीवर त्यांनी पदत्याग करण्याचा निर्णय घेतला आहे.

वेबदुनिया वर वाचा