ओबामांच दौर्‍याने चीन अस्वस्थ, पाक हैराण

बुधवार, 28 जानेवारी 2015 (10:39 IST)
‘अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या दुसर्‍या भारतभेटीमुळे भारत-अमेरिकेतील परस्पर संबंध आणखी दृढ होत असल्यामुळे चीन बिथरला आहे. ओबामा यांची भारतभेट म्हणजे आशियात शिरकाव करण्याचा आणि भारताचा वापर करून चीनवर वचक ठेवण्याचा डाव असून अमेरिकेच्या या जाळ्यात भारताने अडकू नये,’ असा इशारा चीनने भारताला दिला आहे. दुसरीकडे पाकही हैराण आहे.
 
चीन सरकारच्या सीसीटीव्ही या वृत्तवाहिनीवर मोदी-ओबामा यांच्या भेटीला ब्रेकिंगचे स्थान मिळत गेल्या दोन दिवसांपासून सीसीटीव्हीवर या बातम्या गाजत आहेत. या भेटीचा चीनवर कितपत परिणाम होऊ शकतो? आशियात चीनच्या वाढत्या प्रभावावर वचक ठेवण्यासाठी अमेरिकेचा हा डाव आहे का? यासारख्या प्रश्नांवर प्रसारमाध्यमांमध्ये चर्चा सुरू आहे. भारताचा दुसर्‍यांदा दौरा करणारे बराक ओबामा हे अमेरिकेचे पहिलेच राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. 

वेबदुनिया वर वाचा