Paul Teal Death: चित्रपटसृष्टीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्याने जगाचा निरोप घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार प्रसिद्ध अभिनेत्याचे वयाच्या 35 व्या वर्षी निधन झाले आहे. अभिनेता पॉल टील यांच्या निधनाने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. तसेच त्याच्या मृत्यूने स्टार्सनाही धक्का बसला आहे. पॉल टील यांना कर्करोगाने ग्रासले होते परंतु कर्करोगाविरुद्धची लढाई मध्ये ते अपयशी ठरले आहे.
पॉल टिलने हॉलिवूडच्या जगभर प्रसिद्ध असलेल्या 'वन ट्री हिल' या नाटक मालिकेत काम केले. या मालिकेतून त्याला चांगली ओळख मिळाली. पॉल टील यांच्या निधनाची बातमी त्यांची जवळची मैत्रीण सुसान टोलर वॉल्टर्स यांनी दिली आहे. कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी लढताना पॉल टील यांनी जगाचा निरोप घेतल्याचे त्यांनी सांगितले.