Yogini Ekadashi 2022 योगिनी एकादशी कधी आहे, जाणून घ्या मुहूर्त, पूजाविधी आणि व्रतकथा

गुरूवार, 23 जून 2022 (21:36 IST)
Yogini Ekadashi 2022 Date: ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षात येणारी एकादशी योगिनी एकादशी नावाने ओळखली जाते. हिंदू धर्मात या दिवसाला विशेष महत्त्व आहे. पद्म पुराणानुसार एकादशीची तिथी भगवान श्री हरी विष्णूला अतिशय प्रिय आहे. त्यामुळे जे भक्त कोणत्याही एकादशीचे व्रत करतात, त्यांना त्याचे अनेक पटीने फळ मिळते. एका वर्षात एकूण 24 एकादशी तिथी असतात आणि सर्व एकादशी वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जातात. योगिनी एकादशीच्या दिवशी दान- पुण्य केल्याचे विशेष महत्त्व आहे. म्हणूनच या दिवशी क्षमतेनुसार दान केलेच पाहिजे, असे सांगितले जाते.
 
Yogini Ekadashi 2022 एकादशी व्रत भगवान विष्णूला समर्पित आहे 
एकादशीची तिथी भगवान श्री हरी विष्णूंना विशेष प्रिय आहे. त्यामुळे जे भक्त कोणत्याही एकादशीचे व्रत करतात, त्यांना विशेष फळ मिळते. योगिनी एकादशीच्या दिवशी आपल्या क्षमतेनुसार दान करणे उचित आहे. जाणून घ्या योगिनी एकादशी 2022 कधी आहे, शुभ वेळ, महत्त्व आणि पूजेची पद्धत.
 
योगिनी एकादशी 2022 शुभ मुहूर्त, पारणाची वेळ Yogini Ekadashi 2022 Date Shubh Muhurat Paran Time
एकादशी तिथी प्रारंभ 23 जून रात्री 09:41 वाजेपासून
एकादशी तिथी समाप्ती 24 जून रात्री 11:12 वाजता
 
योगिनी एकादशी व्रत पारण वेळ
योगिनी एकादशी व्रताचे पारणे 25 जून रोजी सकाळी 05:41 वाजेपासून ते सकाळी 08:12 वार्जपर्यंत केले जाईल.
 
योगिनी एकादशी पूजा विधी Yogini Ekadashi Puja Vidhi
योगिनी एकादशी या दिवशी सकाळी उठून स्नान करुन स्वच्छ कपडे परिधान करावे.
देवघराची सफाई करावी.
यानंतर श्री हरि विष्णु यांच्या मूर्तीला गंगाजलाने स्नान करवावे.
आता तुपाचा दिवा लावून विष्णु सहस्त्र नाम स्त्रोत पठण करावे.
या दिवशी प्रभू विष्णुंना खीर किंवा शिरा याचं नैवेद्य दाखवावे.
आपल्याला नैवेद्यात तुळस ठेवणे आवश्यक असल्याचे लक्षात असू द्यावे.
 
योगिनी एकादशी महत्व Yogini Ekadashi Significance
पौराणिक मान्यतेनुसार जे लोक योगिनी एकादशीचे व्रत करतात त्यांना सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. एवढेच नाही तर योगिनी एकादशीचे व्रत केल्याने 88 हजार ब्राह्मणांना भोजन दिल्यासारखे फळ मिळते.
 
एकदा धर्मराज युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णांना योगिनी एकादशी व्रताचे महत्त्व सांगण्याची विनंती केली आणि त्यांनी युधिष्ठिराला सांगितले की जो कोणी योगिनी एकादशी व्रत करतो त्याला पापांपासून मुक्ती मिळते. हे व्रत केल्याने मृत्यूनंतर स्वर्गप्राप्ती होते. योगिनी एकादशीच्या व्रताने आणि भगवान विष्णूच्या कृपेने माणसाला मोक्षप्राप्ती होते. त्यामुळे हे व्रत सर्व लोकांसाठी विशेष फलदायी आहे.
ALSO READ: योगिनी एकादशी व्रत कथा Yogini Ekadashi Vrat Katha

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती