दिवाळीतील सणांपैकी एक प्रमुख सण म्हणजे धनतेरस होय. धनतेरसच्या दिवशी लक्ष्मी आणि धन्वंतरी यांची पूजा केली जाते. तसेच धनतेरसला सोने, चांदी किंवा नवीन भांडी खरेदी केल्यानंतर त्यांची पूजा करताना व मंत्र म्हणणे शुभ मानले जाते. तसेच पूजा करताना स्वच्छता राखा, दिवा आणि अगरबत्ती लावा, आणि मंत्रांचा जप शांत मनाने करा. यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते. धनतेरस दिवशी कोणते मंत्र म्हणावे खाली दिले आहे..
ALSO READ: Dhanteras 2025 फसवणूक टाळण्यासाठी या धनत्रयोदशीला सोने खरेदी करताना लक्षात ठेवा या गोष्टी
लक्ष्मी मंत्र-धनतेरसच्या संध्याकाळी लक्ष्मी पूजेदरम्यान हा मंत्र 108 वेळा किंवा कमीतकमी 11 वेळा म्हणावा.
धन्वंतरी मंत्र- धन्वंतरी पूजेसाठी हा मंत्र 108 किंवा 21 वेळा जपावा, विशेषत: नवीन भांडी खरेदी केल्यानंतर किंवा औषधी पूजन करताना.
खालील मंत्र मराठी उच्चारणासह दिले आहे, जे तुम्ही धनतेरसच्या पूजेदरम्यान म्हणू शकता
१. लक्ष्मी मंत्र-धन, समृद्धी आणि सौभाग्यासाठी
मंत्र-
ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद ॐ श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्म्यै नमः
मराठी उच्चार-
ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्म्यै नमः
अर्थ-
या मंत्राद्वारे महालक्ष्मीला समृद्धी, धन आणि सौभाग्यासाठी प्रसन्न करण्याची प्रार्थना केली जाते.