चतुर्थी ही हिंदू धर्मात महत्वाचे मानले जाणारे पर्व आहे. अंगारिका चतुर्थी असो किंवा संकष्टी यांचे महत्व खूप असते. चतुर्थी ही गणपतीला अर्पित असते. 27 एप्रिल रोजी सकाळी 08:17 वाजता चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी सुरू होईल. वैदिक दिनदर्शिकेनुसार, 28 एप्रिल रोजी ही तिथी सकाळी 08:21 पर्यंत असेल. तसेच चंद्राची पूजा करणे हे चतुर्थीच्या दिवशी महत्वपूर्ण मानले जाते. 27 एप्रिल रोजी संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळण्यात येणार आहे.