✕
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, शंकराची आरती मराठी अर्थासह
Webdunia
रविवार, 12 जून 2022 (18:15 IST)
लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।
ब्रह्मांडातील ग्रहता-यांच्या, आकाशमालांच्या माळा तुझ्या गळ्यात लवथवत आहेत, डोलत, वळवळत आहेत!
वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ॥
समुद्रमंथनातून आलेले विष प्राशन करून तुझा कंठ काळवंडला आहे, तुझ्या तीन्ही नेत्रातून भयानक ज्वाळा बाहेर पडत आहेत!
लावण्यसुंदर मस्तकीं बाळा ।
अतीशय लावण्यवती, सुंदर अशी बाळा, कन्या, स्त्री तुझ्या मस्तकावर आहे (गंगा)
तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां ॥ १ ॥
तिथून अतीशय निर्मळ अशा गंगाजलाचा झरा वाहातो आहे!
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
हे शंकरा तुझा जयजयकार असो!
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥ ध्रु० ॥
कापरासाख्या गो-या वर्णाच्या तुझी आम्ही आरती ओवाळतो!
कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा ।
हे कर्पुरगौर शंकरा, तु भोळा आहेस, विशाल नेत्र असलेला आहेस...
अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा ॥
तुझी अर्धांगिनी पार्वती (शक्ती) ही जणु तुझे (शिवाचे) अर्धे अंगच आहे, तुझ्या गळ्यात फ़ुलांच्या माळा आहेत.
विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा ।
चिताभस्माची उधळण अंगभर केलेल्या तुझा कंठ विषप्राशनाने काळा-निळा (शिति) पडलेला आहे...
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ जय देव० ॥ २ ॥
असा तु उमेवर अत्यंत प्रेम करणारा शोभत आहेस!
देवीं दैत्यीं सागरमंथन पै केलें ।
त्यामाजीं अवचित हलहल ते उठिलें ॥
देव आणि दैत्य यांनी जेंव्हा समुद्रमंथन केले तेंव्हा त्यातून अचानक हलाहल नामक विष बाहेर पडले...
तें त्वां असुरपणें प्राशन केलें ।
नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें ॥ जय देव० ॥ ३ ॥
ते तू आसुरी वृत्ती धारण करून प्राशन केल्यानेच तुला नीळकंठ या नावाने प्रसिद्धी मिळाली...
व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।
वाघाचे कातडे ल्यालेल्या, नागबंध धारण केलेल्या, सुंदर रुप असलेल्या, मदनाचा संहार केलेल्या...
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ॥
पाच मुखे असणा-या, मनमोहका, मुनीजनांना आनंद देणा-या...
शतकोटीचें बीज वाचे उच्चारी ।
शतकोटी नामांचा जो बीज मंत्र, तो "श्रीराम जय राम जय जय राम " हा मंत्र सतत वाचेने उच्चारणा-या...
रघुकुलतिलक रामदासा अंतरीं ॥ जय देव जय देव० ॥ ४ ॥
आणि त्या रामनाम उच्चारणाने साक्षात रामरूप झालेल्या हे शंकरा. रघुकुलतिलका, तुला रामदासाचा अंत:करण पूर्वक नमस्कार असो!
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
सोमवारची आरती
श्री शंकराची आरती
गायत्री मंत्र : या मंत्राचा जप केल्याने मन मजबूत होते आणि एकाग्रता वाढते
Drying Plants Indication: तुळशीसोबत या रोपांच्या वाळल्यामुळे देखील होऊ शकते नुकसान
संकष्टी चतुर्थी 2022: कृष्णपिंगल संकष्टी चतुर्थी कधी आहे? पूजा मुहूर्त आणि चंद्रोदयाच्या वेळा जाणून घ्या
सर्व पहा
नवीन
ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचे असे ५ रहस्य जे तुम्हाला अजिबात माहित नसतील
महादेवाला प्रिय आहेत या राशी, त्यांना नेहमीच आधार देतात
Ganesh Chaturthi 2025 गणेश चतुर्थी कधी, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी आणि महत्त्व जाणून घ्या
Kamika Ekadashi 2025 कामिका एकादशीची योग्य तारीख, शुभ मुहूर्त आणि पूजा पद्धत जाणून घ्या
Solah Somwar fastसोळा सोमवार व्रत सुरू करण्यापूर्वी जाणून घ्या या संबंधित महत्त्वाच्या गोष्टी
सर्व पहा
नक्की वाचा
रात्री १२ ते ३ या वेळेला राक्षसी काळ मानला जातो, जाणून घ्या या वेळी पूजा का केली जात नाही...
या तारखेच्या आसपास आशियामध्ये मोठा भूकंप होऊ शकतो, काळजी घ्या
Monsoon Special गरमागरम पकोड्यांसोबत बनवा कांद्याच्या या दोन रेसिपी
तुम्हालाही ट्रम्प यांच्यासारखा आजार आहे का?, हृदयापर्यंत रक्त पोहोचण्यास अडचण येते; त्याची लक्षणे आणि उपचार जाणून घ्या
कुत्र्यांच्या नखांनी रेबीजचा संसर्ग होऊ शकतो का?
पुढील लेख
गायत्री मंत्र : या मंत्राचा जप केल्याने मन मजबूत होते आणि एकाग्रता वाढते