व्रत करणार्यांनी या दिवशी सकाळी उठून नित्यकर्म आटपून स्नान करावे.
नंतर लाकडीच्या पाटावर स्वच्छ काळ्या रंगाचे कापड आसन म्हणून घालावे.
यावर शनी देवांची प्रतिमा किंवा फोटोची स्थापना करावी.
मुरती किंवा फोटो नसल्यास एक सुपारी ठेवून त्या भोवती शुद्ध तूप आणि तेलाचा दिवा लावावा.
नंतर धूप जाळावा.
या स्वरूपाला पंचगव्य, पंचामृत, अत्तर इतर वस्तूंनी स्नान करवावे.
शेंदूर, कुंकू, काजळ, अबीर, गुलाल इतर वस्तूंसह निळे फुलं देवाला अर्पित करावे.