देवळात जाताना हे नियम पाळल्याने दर्शन लाभ होईल...

देवळात जाण्यापूर्वी देवाचे नामस्मरण करत भावपूर्ण दर्शन होऊ दे अशी आस असावी. 
देवळात जाताना अंगावरील चामड्याच्या वस्तू काढून ठेवाव्या.
गळ्याभोवती कोणतेही वस्त्र गुंडाळू नये.
चपला- जोडे देवालय क्षेत्राच्या बाहेरच काढावेत. देवालयाच्या आवारात वा देवळाबाहेर चपला- जोडे काढावे लागत असल्यास ते देवाच्या उजव्या बाजूला काढावे.
पाय धुऊन हातात पाणी घेऊन ‘अपवित्र पवित्रो वा’, हा श्लोक तीनदा म्हणून अथवा ‘पुंडरिकाक्षाय नम:’ असे तीनदा उच्चारून स्वतःच्या सर्वांगावर तीनदा पाणी शिंपडावे.
स्थानिक परंपरेनुसार दर्शनाला जाताना पुरुषांनी डोक्यावर टोपी घालावी तर महिलांनी डोक्यावरून पदर घ्यावा.
देवळाचे प्रवेशद्वार आणि गरुडध्वज यांना नमस्कार करावा.
देवळाच्या कळसाला नमस्कार करावा.
रांगेत बोलणे टाळणे, दर्शनासाठी जाताना नामजप करत राहावे. 
सभामंडपाकडे जाताना हात नमस्काराच्या मुद्रेत ठेवावेत. 
देवळाच्या पायर्‍या चढताना उजव्या हाताच्या बोटांनी पायरीला स्पर्श करून हात आज्ञाचक्राच्या ठिकाणी ठेवावा.
सभामंडपात प्रवेश करण्यापूर्वी प्रथम सभामंडपाच्या द्वाराला दुरून नमस्कार करावा.
सभामंडपाच्या पायर्‍या चढताना उजव्या हाताच्या बोटांनी पायरीला स्पर्श करून हात आज्ञाचक्राच्या ठिकाणी ठेवावा.
सभामंडपाच्या डाव्या अंगाने चालत गाभार्‍यापर्यंत जावे. 
देवळातील घंटा अतिशय लहान नाद होईल या प्रकारा वाजवावा.
गाभार्‍यात जाताना प्रवेशद्वारावर श्री गणपती आणि कीर्तीमुख असल्यास त्यांना नमस्कार करावे.
देवतेचे दर्शन घेण्यासाठी देवतेची मूर्ती आणि समोर असलेली कासवाची प्रतिकृती किंवा शिवालयात पिंडी आणि तिच्या समोर असलेली नंदीची प्रतिकृती यांच्यामध्ये उभे न राहता यांना जोडणार्‍या रेषेच्या अंगाला उभे राहावे.
देवतेचे दर्शन घेताना आधी चरणांशी दृष्टी ठेवून, नतमस्तक व्हावे.
नंतर देवतेच्या छातीशी मन एकाग्र करावे. 
शेवटी देवतेच्या डोळ्यांकडे पाहावे आणि त्यांचे रूप डोळ्यांत साठवावे.
देवाला नमस्कार करावा आणि नमस्कार करताना पुरुषांनी टोपी काढावी मात्र स्त्रियांनी डोके झाकावे.
देवाचे दर्शन झाल्यानंतर सभामंडपाच्या दुसर्‍या, उजव्या अंगाने बाहेर पडावे.
मग गाभार्‍याच्या बाहेरच्या भागात डाव्या कडेस उभे राहून प्रदक्षिणेला आरंभ करावे.
हात जोडून नामजप करत मध्यम गतीने प्रदक्षिणा घालाव्यात.
प्रदक्षिणा घालत असताना गाभार्‍याला बाहेरच्या बाजूने स्पर्श करू नये.
प्रदक्षिणा घालतांना देवतेच्या पाठीमागे थांबून नमस्कार करावा.
सर्वसाधारणता देवांना सम संख्येने आणि देवींना विषम संख्येने प्रदक्षिणा घालाव्यात.
प्रत्येक प्रदक्षिणेनंतर देवतेला नमस्कार करून मगच पुढची प्रदक्षिणा घालावी.
प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर उजव्या अंगाला उभे राहून देवतेचे दर्शन घ्यावे.
प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर देवतेला शरणागत भावाने नमस्कार करावा आणि नंतर मानस प्रार्थना करावी.
देवतेला धन, नारळ, नैवेद्य इत्यादी दान करणे
देवतेला अर्पण करावयाची वस्तू चरणांवर अर्पण कराव्या. 
तीर्थ आणि प्रसाद ग्रहण करावे.
देवळातच बसून नामजप करावा.
देवळातून निघताना देवतेला परत एकदा नमस्कार करावा.
देवळातून परत फिरताना देवाकडे पाठ न फिरवता सात पावले मागे यावे.
परत एकदा कळसाला नमस्कार करावा आणि मगच प्रस्थान करावे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती