ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना जीवनगौरव पुरस्कार
लोकशाहीर विठ्ठल उमप फाऊंडेशनचा स्मृती संगीत समारोह आणि मृद्गंध पुरस्कार सोहळा नुकताच झाला.या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
तसेच सूत्रसंचालक आणि अभिनेते डॉ. नीलेश साबळे आणि संगीतकार व गायक अमितराज व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे डॉ. अभय बंग, साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, लोककलावंत शकुंतला नगरकर यांना मृद्गंध पुरस्कार प्रदान करण्यात आले.