परशुरामाने स्वत:चे धनुष्य रामाला देऊन टाकले

शनिवार, 25 एप्रिल 2020 (13:49 IST)
एकदा दशरथपुत्र रामाची कीर्ती ऐकून परशुराम त्यांच्या पराक्रमाची परीक्षा पहाण्यासाठी पोहचले. तसे ते रागावलेले होते की महादेवाचे धनुष्य तोडण्याचा साहस केला तरी कोणी? अशात परशुराम रामाच्या वाटेत आडवे आले आणि त्यांच्यातील संवाद झाल्यावर त्यांनी रामाला आपले धनुष्य देऊन ते वाकवून त्याला बाण लावून दाखवण्यास सांगितले. 
 
रामाने सहज तसे केले व आणि नंतर हा बाण मी कशावर सोडू म्हणून विचारले. तेव्हा `माझी या (काश्यपी) भूमीवरची गती निरुद्ध कर’, असे परशुरामाने सांगितल्यावर रामाने तसे केले. 
 
या प्रसंगी परशुरामाने स्वत:चे धनुष्य रामाला देऊन टाकले. अशा प्रकारे परशुरामाने धनुष्य देऊन आपले क्षात्रतेज रामात संक्रमित केले.
 
परशुरामांचे वैशिष्ट्ये
अग्रत: चतुरो वेदा: पृष्ठत: सशरं धनु: ।
इदं ब्राह्मं इदं क्षात्रं शापादपि शरादपि ।।
 
चार वेद मुखोद्गत आहेत व पाठीवर बाणांसह धनुष्य आहे अर्थातच ज्ञान आणि शौर्य आहे. म्हणजेच ब्राह्मतेज व क्षात्रतेज अशी दोन्ही तेजे आहेत. जो कोणी विरोध करील, त्यास शाप देऊन अथवा बाणाने परशुराम हरवील.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती