वानरवीर अंगद यांचे 7 गुपितं आपल्याला नक्कीच माहीत नसतील

अनिरुद्ध जोशी

शुक्रवार, 17 एप्रिल 2020 (13:21 IST)
आपणास सगळ्यांना विदितच आहे की अंगद महाबली वानरराज बाळीचा मुलगा होता. अंगद पण आपल्या वडिलांसारखा महाशक्तीशाली होता. आज आपण अंगद आणि त्याचा सामर्थ्य आणि त्यांच्याबद्दलचे गुपित जाणून घेऊ या...
1 कोण होता अंगद - अंगद वानरराज सुग्रीवचा भाऊ बाळीचा मुलगा होता. त्याची आई तारा ही एक अप्सरा होती.
 
2 अंगदला वडिलांची शिकवणी - ज्या वेळेस श्रीरामाने अंगदच्या वडिलांचे वध केले त्यावेळी बाळीने मरताना आपल्या मुलाला अंगदला बोलावून तीन महत्त्वाची शिकवण दिली. बाळीने सांगितले पहिली गोष्ट लक्षात घे की आपण देश, काळ, वेळ आणि परिस्थिती बघून कार्य करायला हवे. दुसरी गोष्ट कोणा बरोबर, कधी, कुठे आणि कसे वागावे, याचा योग्य तो निर्णय घेणे, आणि तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आवडी-निवडी, सुख-दुःख, सहन करून क्षमाशील जीवन जगणे हेच जीवनाचे सार आहे. आज पासून तू तुझ्या काका सुग्रीव सोबत राहावयाचे आणि श्रीरामाची सेवा करायची. ते त्रेलोक्यपती आहे. त्यांचा आश्रयामध्ये राहा. अंगद बळीच्या सांगण्यावरून सुग्रीवाच्या बरोबर राहून श्रीरामाची सेवा करू लागला आणि प्रभू श्रीरामाने दिलेले सर्व उत्तरदायित्व नीट नेटके पार पाडले. 
 
3 अंगदला युवराज बनविले  - बाळीच्या निधनानंतर सुग्रीवाला किष्किंधाचे राज्य प्राप्त झाले आणि अंगदला युवराज बनविण्यात आले.
 
4 सामर्थ्यवान अंगद - अंगद देखील हनुमानासारखे पराक्रमी व बुद्धिमान होते. आत्म बळावर काहीही करण्यात पारंगत होते. रामाच्या सैन्यात अंगदने मोठं धाडसं दाखविले. देवी सीतेला शोधणार्‍या वानरसेनेचे नेतृत्व युवराज अंगदनेच केले होते.  संपातीकडून सीता लंकेत असल्याचे कळल्यावर अंगद समुद्रापलीकडे जाण्यास तयार झाला, पण सैन्य प्रामुख्य असल्यामुळे जामवंत ह्यांनी अंगदला जाऊ दिले नाही. म्हणून हनुमानजी लंकेला गेले.
 
5 श्रीरामाचे दूत अंगद - राम आणि रावणाच्या युद्धाच्या आधी श्रीरामाने युवराज अंगदला हनुमानाच्या नंतर शांतिदूत म्हणून पाठविले होते जेणे करून युद्ध घडू नये. अंगदने लंकेत जाऊन रावणाला शिकवणी दिली. 
 
जौं अस करौं तदपि न बड़ाई। 
मुएहि बधें नहिं कछु मनुसाई॥
कौल कामबस कृपिन बिमूढ़ा। 
अति दरिद्र अजसी अति बूढ़ा॥1॥
सदा रोगबस संतत क्रोधी। 
बिष्नु बिमुख श्रुति संत बिरोधी॥
तनु पोषक निंदक अघ खानी जीवत सव सम चौदह प्रानी॥2॥
 
गोस्वामी तुलसीदासकृतं रामचरितमानस या महाकाव्यात बाळीचा मुलगा अंगद याने रावणाला त्याचाच दरबारात शिकवणी दिली. असे कोणते दुर्गुण आहे ज्यामुळे माणसाला मृत मानले गेले आहे. रामचरित मानसमध्ये त्याच 14 दुर्गुण बद्दल सांगितले आहे.
 
6 अंगदाचा पाय - ज्या वेळेस रावणाने अंगदला अपमानित केले होते तेव्हा अंगदाने रावणाला फटकारले. चिडून रावणाने अंगदला पकडण्यास सांगितले. त्यावेळी अंगद म्हणाला मी आयुष्याची एक कृती करत आहे, माझ्या चारित्र्यात चमक असल्यास हे माझे पाय आहे. माझ्या या पायाला जर का कोणीही जागेवरून हालवले तर मी माता सीताचा त्याग करून श्रीरामाला स्वतः अयोध्येला घेऊन जाईन. त्याने संपूर्ण शक्ती लावून आपल्या शरीराला विशाल आणि बलिष्ठ केले आणि आपले पाय जमवले. 
 
रावणाच्या राज्यसभेत असे कोणीही नव्हते की ते अंगदाच्या पायाला हालवू शकेल. रावणाच्या सभेत सर्व सामर्थ्यवानाने प्रयत्न करून कोणालाही यश हाती आले नाही तेव्हा संतापून स्वतः लंकेश अंगदचा पाय उचलण्यासाठी अंगदच्या पायाला हात लावण्यासाठी वाकला. तेवढ्यात अंगदने आपला पाय उचलला आणि रावणाला म्हणाला - हे रावण ! माझ्या पायाला हात लावणे योग्य नाही. माझ्या पायाला स्पर्श करण्यापेक्षा आपण श्रीरामाच्या आश्रयाला जावे. हे ऐकून रावण शांत होऊन आपल्या स्थळी जाऊन बसला.
 
7 शेवटी काय झालं - लंकेवर विजय मिळवल्यावर श्रीरामाचा अयोध्येत राज्याभिषेक झाला. सगळ्या वानरांना निरोप दिल्यावर श्रीराम अंगद जवळ आले. तेव्हा अंगद त्यांना म्हणाले की हे नाथ माझ्या वडिलांनी मला आपल्या आश्रयात दिले होते तेव्हा आपण माझा त्याग करू नये. मला आपल्या पायथ्याशी राहू द्या. असे म्हणत अंगद भगवंताच्या पाया पडले. श्रीरामाने त्याला आपल्या हृदयाला कवटाळून वस्त्र आणि आभूषण देऊन अंगदला समजावून किष्किंधाला पाठवणी केली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती