आर्थिक राजधानी मुंबईमध्ये कोरोनाव्हायरसचे जोरदार थैमान सुरू असून, त्यामुळे आता बृहन्मुंबई महानगरपालिकेने करोना संशयितांच्या नमुन्यांच्या चाचणी बाबतचे नियम बदलले आहेत. आता फक्त करोनाची लक्षणे (symptoms) लोकांमध्ये दिसतात त्यांची चाचणी केली जाईल. ज्या लोकांमध्ये करोनाची लक्षणे दिसत नाहीत (asymptomatic) त्यांच्या नमुने चाचणीसाठी (टेस्टिंग) गोळा करण्यात येणार नाहीत. हे नियम मुंबई महानगरपालिका आणि इतर सरकारी व खासगी रुग्णालयं व चाचणी केंद्रांसाठी लागू असणार आहेत.