रामायण आणि महाभारतातील 10 साम्य, जाणून व्हाल हैराण
मंगळवार, 21 एप्रिल 2020 (15:46 IST)
रामायणाचा कालखंड आणि महाभारतातील काळ हे भारताच्या इतिहासामधील महत्त्वाचे काळ आहे. महर्षी वाल्मीकी आणि अन्य ऋषींनी रामायण काळ लिहिले आहे. तर महर्षी वेद व्यासांनी महाभारताचा काळ लिहिला आहे. आम्हाला रामायण आणि महाभारतामधील घडलेल्या 10 आश्चर्यकारक सम गोष्टी सापडल्या आहे. चला तर मग जाणून घेऊ या काय आहे या गोष्टी-
1 दोन्ही ग्रंथाचे नायक - रामायणातील नायक प्रभू श्रीराम असे तर महाभारतातील नायक पाच पांडव होय. इथे पांडवांना नायक म्हणावे लागणार कारण संपूर्ण महाभारत त्यांचाच भोवती रचले आहे. श्रीकृष्ण तर त्यांचे सहकारी होते आणि त्यांची महत्ता तर वेगळीच होती. जी आपल्याला भगवद्गीतेमध्ये सापडते. रामायण आणि महाभारतातील सर्व नायकांमध्ये एक साम्य असे आहे की ते सर्व दिव्यपुरुष होते. श्रीरामांचा जन्म पुत्र कामेष्टी यज्ञापासून झाला होता. तसेच महाभारतातील पांडव देवांचा प्रसाद होते. त्यांचा जन्माविषयीचे गूढ आहेच.
2 दोन्ही ग्रंथाची नायिका - वाल्मीकींच्या रामायणातील नायिका सीता आहे. महर्षी वेदव्यासांनी लिहिलेल्या महाभारतातील नायिका द्रौपदी असे. या दोघीमधील सर्वात मोठे साम्य म्हणजे की या दोघींना लक्ष्मीचा अवतार म्हटले आहे आणि दुसरे म्हणजे की या दोघींनी आपल्या आईच्या पोटी जन्म घेतला नाही. देवी सीता पृथ्वीतून परतलेली आहे तर द्रौपदी यज्ञाच्या अग्नीमधून निघाली आहे.
3 दोन्ही काळातील युद्धाचे कारण - दोन्ही काळामध्ये नायिकेमुळेच युद्ध झाले आहे. रामायणामध्ये देवी सीतेेेेला रावणाने हरण करून नेल्याने राम आणि रावणाचा युद्ध झाला तसेच महाभारतामध्ये द्रौपदीच्या अपमानाच्या बदला घेण्यासाठी सर्व पांडव वचनबद्ध होते. ती प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी त्यांनी कौरवांशी युद्ध केले. महाभारत आणि रामायणातील युद्धाचे एक कारण अजून आहे की रामायणातील युद्ध सीताच्या हरणानंतर झाले आणि महाभारतातील युद्ध द्रौपदीच्या वस्त्र हरणानंतर झाले.
4 14 वर्षे वनवास - रामायणाच्या काळात प्रभू श्रीराम यांना कैकेयी आणि मंथरामुळे 14 वर्षे वनवास भोगावे लागले तर महाभारताच्या काळात पांडवांना द्यूतक्रीडा मध्ये पराभूत झाल्यानंतर 13 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास सोसावा लागला होता.
5 वैवाहिक जीवनात साम्य - रामायणात प्रभू श्रीरामाला सीतेेेेशी लग्न करण्यासाठी धनुष्यावर दोरी लावायची होती आणि असे करताना धनुष्य मोडले गेले. तसेच महाभारतामध्ये अर्जुनाला द्रौपदीशी लग्न करण्यासाठी धनुष्यावर बाण लावून मासोळीच्या डोळ्याला मारावयाचे असे. हे दोन्ही कार्य महाभारतामध्ये ज्यावेळी पांडव लाक्षागृहामधून सुटल्यावर जंगलात भटकंती करीत असताना घडली तसेच प्रभू श्रीराम अरण्यामध्ये ऋषी मुनींच्या मदतीसाठी गेले असताना घडले होते.
6 नायिकांचे हरण - रामायणात आणि महाभारतात या दोघांमध्ये नायिका वनवासात गेले असताना रावण सीतेचे हरण करून नेतो तसेच द्रौपदीला जयद्रथ हरण करून नेतो. पांडव द्रौपदीला जयद्रथापासून वाचवतात.
7 देवांची मुलं - रामायण काळात ही असे बरेच लोकं होते जी देवांची मुलं असे. जसे की मारुती पवनपुत्र, जाम्बवन्त अग्नी देवाचे पुत्र, वानरराज बाली देवराज इंद्राचे पुत्र, त्याच प्रमाणे महाभारताच्या काळात देखील अर्जुन इंद्रपुत्र, भीम पवनपुत्र, युधिष्ठिर धर्मराज पुत्र असे. ह्यामधील पवनपुत्र मारुती आणि पवनपुत्र भीम हे दोघेही गदा युद्धात कुशल असे.
8 भावामध्ये प्रेम - दोन्ही महाकाव्यात एक साम्य असे ही होते की नायकांची आई वेगळी होती तरीही सर्व भावंडांमध्ये आपसात प्रेमळ नातं होत आणि सर्व भाऊ आपल्या मोठ्या भावाच्या आज्ञेचे पालन करीत असे.
9 गीता सारखे दोन लोकांचे संवाद- रामायणात आणि महाभारतात दोन लोकांचे धर्माबद्दलचे गोष्टींचा उल्लेख प्रामुख्याने आढळतो. रामायणातील शिव आणि पार्वतीचे संवाद, ऋषी विश्वामित्र आणि राजा दशरथ यांच्यातील संवाद, भरत आणि कैकेयीचे संवाद, लक्ष्मण आणि परशुरामाचे संवाद, अंगद आणि बालीचे संवाद, जाम्बवन्त आणि हनुमानाचे संवाद, मंदोदरी आणि रावणाचे संवाद, रावण आणि विभीषणाचे संवाद, अंगद आणि रावणाचे संवाद, रावण आणि लक्ष्मणाचे संवाद. ह्याच प्रमाणे महाभारतात श्रीकृष्ण आणि अर्जुनाचे संवाद, धृतराष्ट्र आणि संजयचे संवाद, धृतराष्ट्र आणि विदुराचे संवाद, हीच विदुराचे धोरण, यक्ष आणि युधिष्ठिर संवाद, भीष्म आणि युधिष्ठिर संवाद होय.
10 राज्याभिषेक - रावण वध झाल्यावर अयोध्येमध्ये रामाच्या राज्याभिषेक झाला तेव्हा धर्माचे राज्य स्थापन झाले आणि लोक शांतते जगू लागले. दुसरीकडे कुरुक्षेत्राचे युद्ध संपल्यावर धर्माचे राज्य स्थापन झाले आणि युधिष्ठिर राजा झाले.