श्री कोकिळा माहात्म्य अध्याय सहावा
बुधवार, 19 जून 2024 (11:09 IST)
॥ श्रीगणेशाय नम: ॥
धर्म म्हणे दयासागरा ॥ कथा सागावि दातारा ॥ दक्षायणीचा जन्म बरवा ॥ श्रवण केला परमप्रिती ॥१॥
देवाधिदेव म्हणे धर्मा ॥ येथचा अगाधा महिमा ॥ येथे धरितां परम प्रेम ॥ कैलासपदप्राप्त होय ॥२॥
दक्षायणीचा जन्म झाला ॥ पुढें जन्मकाळ वर्णिला ॥ तोही आदरें आयकिला ॥ अदिअंत व्रत सांगावें ॥३॥
दक्ष म्हणे वसिष्ठमुनी ॥ कोणासी देऊं हे दाक्षायणी ॥ वसिष्ठ म्हणे सुळपाणी ॥ कोणासी देऊं हें दाक्षायणी ॥
त्यापरता कोणी दिसेना ॥४॥
भोळा चक्रवर्ती शिव ॥ ज्यासी ध्याती ब्रह्मादि देव ॥ कन्या देऊनी शिव ॥ सखा करी दक्षराया ॥५॥
ऐसें ऐकतां वच्न ॥ दक्ष आनंदला परिपूर्ण ॥ मग वसिष्ठासी पाठवून ॥ शिवसांब आणिला ॥६॥ब
ब्रह्मादिक सुरवर ॥ अठ्यायसीं सहस्त्र ऋषेश्वर ॥ गणगंधर्व यक्षगण किन्नर ॥ विद्यावंत लग्नासी आणविलें हो ॥७॥
शाण्णवकुळीचे भूपती ॥ प्रजापौरज सर्व येती ॥ दक्षाचा हर्ष न मावे चित्तीं ॥ म्हणे मी धन्य दैवाचा ॥८॥
आनंदे लग्न केलें पूर्ण ॥ अपार दक्षे दिधले आंदण ॥ शंभू दाक्षायणी घेऊन ॥ कैलासाप्रति जाते झाले ॥९॥
पुढें ती म्हणे धर्मराजा ॥ अहो देवा गरुडध्वजा ॥ शिवदक्षा विरस कां झाला ॥ सांगा कृपाकरोनी ॥१०॥
श्रीकृष्ण म्हणे धर्मराया ॥ ऐकी कथा प्रेम सखया ॥ कैलासाप्रती शंभु तया ॥ भेटी समस्त देव आले ॥११॥
प्रदोष समय परम पवित्र ॥ आनंदे असतां पंचवगंत्र ॥ गीत नृत्यादि महामंत्र ॥ होती तेव्हां शिवापुढें ॥१२॥
त्या समयी दक्ष येता झाला ॥ सर्वाहीं बहु सन्मान केला ॥ शिव तैसाच सिंहासनी बैसला ॥ दक्षाकडे न पाहे ॥१३॥
दक्ष उभा क्षण एक ॥ म्हणे जांवई जोडला शतमूर्ख ॥ सन्मान माझा न करी देख ॥ यासी ज्ञान नसे कांही ॥१४॥
सदां भुतांमाजि बैसे ॥ रुंडमाळा मिरवीत असे ॥ साक्षपे नंदीवर बैसे ॥ विभुती सर्व अंगी लाविली ॥१५॥
सर्प वेष्टी ठायी ठायीं ॥ निर्मळ न दिसे कांही ॥ विभुती चर्चि सर्व देही ॥ विदेही म्हणती त्यासी ॥१६॥
भिकारी अत्यंत दीन ॥ हातीं नरोटी घेऊन ॥ भिक्षा मागे दीनवदन ॥ भाग्य फुटलें दाक्षायणीचें ॥१७॥
ऐसेंनी दक्ष करीत ॥ विरुपाक्षी अन्न दे निर्भरीत ॥ दक्ष तेथून परतला ॥ कांही उत्तर न बोले तेधवां ॥१८॥
शिव आनंदे निर्भर ॥ दक्षगृहा आला सत्वर ॥ अकस्मात मुनी कपीलेश्वर ॥ येते झाले दक्षगृहा ॥१९॥
म्हेणे स्वामी महाऋषी ॥ तेज:पुंज पाव आम्हांसी ॥ दाविले अंजन नयनासी ॥ कृतकृतार्थ झालों म्हणे ॥२०॥
पूजन अर्चन जाहलिया ॥ दक्ष म्हणे ऋषीवर्या ॥ पुत्र प्राप्ती व्हावया ॥ स्वामी यज्ञ सांगा कांही ॥२१॥
कपिलमुनी म्हणतसे तयाला ॥ तुवां यज्ञ करावे वहिला ॥ करावे हे उचित तुजला ॥ सत्यसत्य त्रिवाचा ॥२२॥
दक्ष म्हणे महाऋषी ॥ यज्ञ आरंभावा आदरें ॥ मग प्रवर्तले साहित्यासी ॥ आनंदे अपार ॥२३॥
एक शंभु वेगळा करुन ॥ सकळ बोलाविले सुरगण ॥ यज्ञालागीं आरंभून ॥ आनंदे करिती मंत्रघोष ॥२४॥
इकडे कैलासाचे ठायीं ॥ आंबा पुष्येवचीता पाहे ॥ विमाने जाती लवलाही ॥ द्क्षयाग कारणें ॥२५॥
सागारीं देखतां जगतजननी ॥ देवें विमानें स्थिर करोनी ॥ जयजयकाराची ध्वनी ॥ उठल्या तेव्हां अपार ॥२६॥
अंबा पुसतसे समस्ता ॥ विमाने कोठें घेऊन जातां ॥ ते म्हणती दक्ष तुमचा तात ॥ यज्ञालागिं बोलाविलें तयानें ॥२७॥
अंबा म्हणे नवल झालें ॥ मज कां दक्षें अव्हेरिलें ॥ लवलाहे गंतव्य केलें ॥ शिवाजवळी पातला ॥२८॥
तेव्हां ती बैसलीसे म्लानवदन ॥ शंकर पुसे दयाधन ॥ कोणी केला अपमान ॥ खेद कासयाचा धरिला ॥२९॥
ती म्हणतसे नंदिवहना ॥ याग होतसे पितृसदना ॥ आपण चलावें पंचवदना ॥ मम समवेत पित्याच्या सदना ॥३०॥
शिव म्हणतसे दाक्षायणी ॥ न बोलावितां यज्ञालागुनी ॥ जातांच होईल सकृहानी ॥ म्हणोनी तेथें न जाईजे ॥३१॥
शिवाचें वचन ऐकोन ॥ देवीचे अश्रुने भरले नयन ॥ तो अकस्मात ब्रह्मानंदन ॥ नारदस्वामी पातले ॥३२॥
न सांग कळले तयासी ॥ म्हणी अगा हे कैलासवासी ॥ जगदंबेस यज्ञासी ॥ जातां मान नसे कांही ॥३३॥
अंबा म्हणतसे जावया मजला ॥ आज्ञा द्यावी मला ॥ शिव म्हणतसे नंदिला ॥ अंबा म्हणे दक्षायज्ञासी ॥३४॥
नंदी सिध्द झाला सत्वर ॥ आरुढोनी अंबावर ॥ पुढें होतसे वाद्यांचा गजर ॥ शिवगण अपार समागमे ॥३५॥
समागमें शंभु नसतां ॥ आणि उदास झाली जगन्माता ॥ ऐसे दुची असतां ॥ दक्षायागा पातली ॥३६॥
येतांचि देखिले पितृवदन ॥ द्क्ष पाहे अंबेचे वदन ॥ मग अंतरगृहांत जाऊन ॥ मातेजवळी पातली ॥३७॥
मातेनें धरिले ह्रदयीं ॥ चुंबन दिधलें लवलाही ॥ म्हणे सखे आज पाही ॥ आज मज थोर वाटला ॥३८॥
मग भगिनी एक शत ॥ त्याजकडे दाक्षायणी विलोकित ॥ तो त्या इजकडे न पहात ॥ भाग्यामध्यें भुलोनियां ॥३९॥
दाक्षायणी झाली लज्जित ॥ क्रोध आला अत्यंत ॥ म्हणी जिणे व्यर्थ ॥ सन्मान कांही न दिसेची ॥४०॥
कोपोनियां भवानी ॥ कुंडी घातली उडी तत्क्षणीं ॥ हाहा:कार झाला सर्व जनीं ॥ चिंता भरीत पै झाले ॥४१॥
नंदीस कोप आला थोर ॥ संग्रामा उभा दुर्धर ॥ पळाले कितीएक सुरवर ॥ यज्ञ विध्वंस जाहला ॥४२॥
पुढील अध्यायी कथा गहन ॥ विरभद्र होईल निर्माण ॥ परिसावें त्याचें चरित्र पूर्ण ॥ श्रवणें दोष नासती ॥४३॥
इति भविष्योत्तरपुराणे ब्रह्मोत्तरखंडे कोकिलामहत्म्ये ॥ षष्ठमोऽध्याय गोडहा ॥४४॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्रीरस्तु ॥