श्री कोकिळा माहात्म्य अध्याय पांचवा
बुधवार, 19 जून 2024 (11:08 IST)
॥ श्रीगणेशाय नम: ॥
समकादिक ऋषी म्हणती ॥ अगा सुता महामती ॥ सांगितली ब्रह्मयाची उत्पत्ति ॥ आणि हनन मधुकैटभाचे ॥१॥
पुढे दक्ष प्रजापतीचा जन्म कथिला त्वां साचा ॥ श्रिया देवीच्या तपाचा ॥ मह्मा निर्धारें कथियेला ॥२॥
पुढें त्रैलोक्याची जननी ॥ आदिमाया जगज्जननी ॥ जन्मली ते लीला श्रवणी ॥ कथा सांग ऐकिली ॥३॥
आतां जन्मकर्म दाक्षायणीचें ॥ निरोपावें आम्हा साचें ॥ सुत म्हणे भाग्य तुमचें ॥ अपार फळा आलें मज वाटे ॥४॥
ऋषी आले अटयायशी सहस्त्र ॥ पुढें वसिष्ठ परम पवित्र ॥ म्हणती दक्षा भाग्य थोर ॥ फळा आलें आजि तुझ्या ॥५॥
कन्या तुझी परम पवित्र ॥ ब्रह्मादि वंदिती सुरवर ॥ महिमा इचा अपार ॥ शेष वर्णू शकेना ॥६॥
हे उभयकुळ तारिणी माया ॥ आधार ईचा ब्रह्मांडासिया ॥ ईच्या अवलोक प्राणिया ॥ ज्ञान होईला अपार ॥७॥
रती वर मदन कोटी ॥ ओवाळून टाकावें चरणांगुंष्टी ॥ कल्पांत सुर्य़ नख दृष्टी ॥ ओवाळावे देवीच्य ॥८॥
चंद्राचें तेज अद्भुत फार जाण ॥ ओवाळावें मुखावरुनी ॥ दक्षेपूर्वी अपार तप करुन ॥ तेचि फळ हे कळुं आले ॥९॥
कन्यादन घडे जरी ॥ कुळ उध्दरे निर्धारी ॥ नारायण आपुले शेजारी ॥ बैसवी कुळासहित ॥१०॥
शास्त्रामध्ये ऐसें आहे ॥ प्रथम कन्या व्हावी पाहे ॥ तेणे जन्म सफल होय ॥ तोचि पुरुष दैवाचा ॥११॥
प्रथम पुत्र झाला जरी ॥ तरी ते लोभाचे फळ भारी ॥ होतां कन्यारत्न उदरी ॥ सुरगण आनंदती ॥१२॥
कैलासनाथ जाश्वनीळ ॥ तोच ईचा भ्रतार अढळ ॥ जयाच्याकृपें ब्रह्मांड सकळ ॥ पालनपोषण होतसे ॥१३॥
साधुसंत योगीजन ॥ भजती निशिदिनी इजलागून ॥ हे दक्षराजया कल्याण ॥ झाले तुझें किती वर्णूं ॥१४॥
जन्मतांचे जगज्जननी ॥ वृक्ष सदां फळ गेले गगनी ॥ पर्जन्य न मागती अवनी ॥ वरी होय अपार ॥१५॥
जनजरार हित झाले तरुण ॥ मृत्यु दरिद्र गेले उडोन ॥ घरोघरी पुराणश्रवण ॥ शिवलीला गीतगाती ॥१६॥
धेनु दुभती त्रिकाळ ॥ कामक्रोधा सुटला पळ ॥ मद मत्सा दंभ सकळ ॥ चळचळां कांपती ॥१७॥
घरी स्त्रिया आणि पुरुष ॥ अक्षयीं झाले निर्दोष ॥ नामस्मरण रात्रंदिवस ॥ करिती सांब शिवाचें ॥१८॥
वल्ली सफळ अवकाळीं ॥ बहुत दाटल्या पुष्पावळी ॥ आदिमाया अवतरली ॥ म्हणुन आनंद जाहला ॥१९॥
म्हणुन व्रत नेम यज्ञयाग ॥ करिती पुण्यपुरुषार्थ संतान ॥ कीर्ति ज्याची त्रिभुवनी ॥ व्यापोनियां राहिली ॥२०॥
व्रतदान नेम न करिती ॥ त्यासी पुत्रपौत्र पापी होती ॥ मातापितयास दु:ख देती ॥ विटंबिती नानापरी ॥२१॥
ऐसा देवीचा जन्मकाळ ॥ वसिष्ठ मुनि वर्णिती सकळ ॥ ऐकती त्यास्सी शिवदयाळ ॥ प्रसन्न होईल निर्धारें ॥२२॥
व्रताचा करिती अव्हेर ॥ त्यास वैधव्य निरंतर ॥ अपदा होती अपार ॥ म्हणोनि आदरें व्रत अर्चावें ॥२३॥
इतिश्री भविष्योत्तरपुराणे ॥ ब्रह्मोत्तरखंडे ॥ कोकिला म्हात्म्ये ॥ पंचमोऽध्याय गोडहा ॥२४॥
अध्याय पांचवा ॥ ओंवी ॥२४॥
॥ श्रीलक्ष्मी नारायणार्पणमस्तु ॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभंभवतु ॥
॥ अध्याय पांचवा समाप्तः ॥