Sandhya Vandana संध्या वंदना हा हिंदू धर्मातील ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या त्रिवर्णीयांनी करावयाची एक उपासना आहे. या उपासनेची सुरुवात उपनयन संस्कार यानंतर केली जाते. प्रतिदिन प्रातःकाळ, माध्यान काळ व सायंकाळ अशा तिन्ही काळी ही उपासना करण्याची पद्धत असते. अर्घ्यदान, गायत्री मंत्र जप व उपस्थान ही संध्येतील मुख्य कर्मे आहेत. संध्या वंदना यात गायत्री देवी, सूर्य, अग्नी, वरुण इतर. देवांची उपासना केली जाते.
संध्या उपासना करण्याची विधी
सकाळी स्नान झाल्यानंतर पूर्वेकडे तोंड करून बसावे.
आचमन -
पुढील तीन मंत्राने उजव्या हातावर पाणी घेऊन आचमन करावे
उजव्या हाताचा अंगठा उजव्या नाकपुडीवर ठेवून डाव्या नाकपुडीने श्वास घेणे याला पुरक असे म्हणतात. पाची बोटाने नाक बंद करून घेतलेला श्वास स्थिर करणे याला कुंभक असे म्हणतात. तर उजव्या नाकपुडी वरील अंगठा काढून उजव्या नाकपुडीने हळूहळू श्वास सोडणे याला रेचक असे म्हणतात. अशाप्रकारे प्राणायाम करावा.
मार्जन -
प्राणायामानंतर सर्व पापांचा अगर वाईट वासनांचा क्षय व्हावा म्हणून उदकाने मार्जन करावे अर्थात अंगावर पाणी शिंपडावे. उदक पापांचा नाश करते. मार्जनात तांब्याच्या पात्रातील पाण्यात कुशाच्या काडया बुडवून ते पाणी अंगावर शिंपडावे. पाणी डाव्या हातात घेऊन उजव्या हातात घेतलेल्या दर्भाने ते पाणी मस्तकावर आणि अंगावर शिंपडणे, अशा प्रकारेही मार्जनक्रिया केली जाते. अघमर्षण म्हणजे पाप बाहेर टाकणे.
अर्घ्यदान - अर्घ्यदान म्हणजे सूर्याला आदराने पाणी अर्पण करणे. दोन्ही हातांच्या ओंजळीत पाणी घेऊन गायत्री मंत्राचा जप करून ते पाणी सूर्य-सन्मुख होऊन तीन वेळा खाली सोडायचे.