Worshiping Surya on Sunday रविवारी व्रत आणि सूर्याची पूजा केल्याचे 5 फायदे

शनिवार, 25 नोव्हेंबर 2023 (21:56 IST)
हिन्दू धर्मानुसार रविवार भगवान विष्णु आणि सूर्यदेवाचा दिवस आहे. या दिवशी त्यांची आराधना केली पाहिजे. हिंदू धर्मात याला सर्वश्रेष्ठ वार मानले आहे. जर आपल्या गरुवारी मंदिरात जाणे शक्य नसेल तर रविवारी जावे. रविवारी उपासान केल्याचे फायदे
 
1. निरोगा काया आणि तेजस्व प्राप्तीसाठी या दिवशी उपास करावा.
 
2. रविवारी व्रत केल्याने व कथा श्रवण केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात.
 
3. रविवारी व्रत ठेवल्याने मान-सन्मानात वृद्धी होते, यश आणि धन प्राप्ती होते.
 
4. जीवनात सुख-समृद्धी, धन-संपत्ती आणि शत्रूंपासून सुरक्षेसाठी रविवारचे व्रत सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे.
 
5. व्रत करुन रविवारी सूर्याला अर्घ्य देण्याचे अनेक लाभ आणि कारणं आहेत. असे म्हणतात की सकाळी सूर्य आराधना केल्याने निरोगी राहण्यास मदत होत. आजर बरे होतात. दुपारी सूर्य आराधना केल्याने यश आणि प्रसिद्धी मिळते. आणि संध्याकाळी सूर्य आराधना केल्याने जीवनात भरभराटी येते. सकाळी सूर्याला जल अर्पित केल्याने किरणांच्या प्रभावामुळे रंग संतुलित होतं आणि शरीरात प्रतिकारक शक्ती वाढते.
 
या प्रकारे करा आराधना
सूर्याचं व्रत एक वर्ष किंवा 30 रविवार किंवा 12 रविवार करावं. रविवारी एकवेळी उपास करुन उत्तम भोजन घ्यावा ज्याने शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. आहारात पदार्थांवर वरुन मीठ घालू नये आणि सूर्यास्तानंतर मीठाचे सेवन करु नये. याने आरोग्यावर परिणाम होतो आणि प्रत्येक कार्यात अडचणी येतात. या दिवशी तांदूळ आणि दूध-गूळ मिसळून सेवन केल्याने सूर्याचे दुष्परिणाम दूर होतात.
 



Edited By- Priya Dixit
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती