गुरु पुष्य योग असेल त्या दिवशी महालक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी आणि धन संबंधी समस्या सोडविण्यासाठी लक्ष्मी नारायणाची पूजा करावी. पूजेत 'ॐ श्री ह्रीं श्रीं दारिद्रय विनाशिन्ये धनधान्य समृद्धी देहि देहि नम:' मंत्राचा कमलगट्ट्याच्या माळेने 108 वेळा जप करावा. शुभ योगात लक्ष्मी मंत्र जप केल्याने धन प्राप्तीचे योग बनतात.
नोकरी प्राप्तीसाठी किंवा नोकरीत यश मिळविण्यासाठी गुरु पुष्य योगात पारद लक्ष्मीची पूजा करावी. पारद लक्ष्मीसह आपण एकाक्षी नारळाची पूजा करु शकता. एकाक्षी नारळाला लक्ष्मी देवीचं स्वरुप मानले गेले आहे. या नाराळाची विधीपूर्वक पूजा करुन धन ठेवत असलेल्या ठिकाणी ठेवल्याने घरात किंवा व्यवसायात कधीच पैशांची कमी भासत नाही.