भीष्म द्वादशी बद्दल प्रचलित कथेनुसार, राजा शंतनू यांची राणी गंगा देवव्रत नावाच्या पुत्राला जन्म देते. नंतर गंगा आपल्या वचनाप्रमाणे शंतनू यांना सोडून निघून जाते. तेव्हा शंतनू गंगेच्या वियोगात दुखी राहू लागतात.
परंतू काही काळ गेल्यावर शंतनू गंगा नदी पलीकडे जाण्यासाठी मत्स्य गंधा नावाच्या कन्येच्या नावेत बसतात आणि तिच्या रूप-सौंदर्यावर मोहित होतात. राजा शंतनू त्या कन्येच्या वडिलांकडे जाऊन तिच्यासोबत विवाहाचा प्रस्ताव मांडतात. परंतू मत्स्य गंधाचे वडील राजा शंतनू यांच्या समक्ष एक अट ठेवतात की त्यांच्या पुत्रीपासून होणारी संतान हस्तिनापूर राज्यावर राज्य करेल अर्थात तेच अपत्य उत्तराधिकारी असेल, तरच विवाह शक्य आहे. हीच (मत्स्य गंधा) पुढे सत्यवती नावाने प्रसिद्ध झाली. राजा शंतनू ही अट मान्य करत नाही पण काळजीत राहू लागतात.
देवव्रत यांना जेव्हा आपल्या वडिलांबद्दल माहीत पडतं तेव्हा ते आजन्म ब्रह्मचारी राहण्याची प्रतिज्ञा घेतात. पुत्राची अशी प्रतिज्ञा ऐकून राजा शंतनू त्यांना इच्छा मृत्यूचे वरदान देतात. आपल्या या वचनामुळे देवव्रत, हे भीष्म पितामह म्हणून प्रसिद्ध झाले.
जेव्हा महाभारताचं युद्ध होतो तेव्हा भीष्म पितामह कौरवांतर्फे युद्ध लढत असताना जेव्हा भीष्मांच्या युद्ध कौशल्यामुळे कौरव जिंकू लागतात तेव्हा श्रीकृष्ण एक युक्ती लढवतात आणि त्यांच्यासमोर शिखंडीला उभे करतात. आपल्या प्रतिज्ञा अनुसार कोणत्याही नपुंसकासमोर भीष्म पितामह शस्त्र उचलणार नाही, हे समजल्यावर भगवान श्रीकृष्ण शिखंडीला भीष्मासमोर उभे करतात. यामुळे भीष्म युद्ध क्षेत्रात आपले शस्त्र त्याग करून देतात. अशात इतर योद्धा संधी साधून त्यांच्यावर बाणांचा वर्षाव करू लागतात. नंतर ते अर्जुनच तयार करुन दिलेल्या शरशय्या अर्थात बाणांच्या बिछान्यावर शयन करतात.
असे म्हणतात की तेव्हा सूर्य दक्षिणायन असल्यामुळे शास्त्रीय मतानुसार इच्छा मरणाचे वरदान प्राप्त असल्यामुळे भीष्म आपले प्राण सोडत नाहीत. ते सूर्य उत्तरायण झाल्यावर आपल्या नश्वर शरीराचा त्याग केला. त्यांनी अष्टमीला आपले प्राण सोडले. म्हणूनच माघ शुद्ध अष्टमीला भीष्माष्टमी असेही म्हटले जाते.मात्र, त्यांची उत्तरक्रिया माघ शुद्ध द्वादशीला करण्यात आली. म्हणून या द्वादशीला भीष्म द्वादशी म्हटले जाते.
हे व्रत केल्याने सर्व आजारांपासून तसेच सर्व पापांपासून मुक्ती मिळते.