गणेश जयंती 2022 : माघी गणेश जयंती, शुभ मुहूर्त व पूजन विधी

शुक्रवार, 4 फेब्रुवारी 2022 (09:15 IST)
माघ मासात शुक्ल पक्षात येणार्‍या चतुर्थीला गणेश जयंती असते. याचे वेगळेच महत्त्व आहे. पौराणिक मान्यतानुसार माघ मासच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला होता. महादेव आणि देवी पार्वतीचे पुत्र गणपती प्रथम पूजनीय मानले गेले आहे म्हणून कोणत्याही शुभ कार्य सुरू करण्याआधी गणपतीची आराधना केली जाते.
 
तिल कुंद चतुर्थीला गणपतीचा प्रभाव एक हजार पट अधिक कार्यरत असतं. गणपती चे स्पंदन आणि चतुर्थीला धरती स्पंदन समान असल्यामुळे धरती व गणपती एकमेकांसाठी अनुकूल मानले गेले आहे अर्थात या दिवशी गणपती उपासना केल्याने निश्चित लाभ होतं. अग्निपुराणमध्ये मोक्ष प्राप्तीसाठी तिलकुंद चतुर्थी व्रताचे विधान सांगितले गेले आहे. 
 
गणेश जयंतीला अनेक लोकं हळद किंवा शेंदुरी गणपतीची प्रतिमा तयार करून त्याची पूजा करतात. तिळाने तयार पदार्थ गणपतीला अर्पित करतात म्हणून याला तिल कुंद चतुर्थी असे ही म्हटले जातं. या दिवशी गणपतीची पूजा करण्यापूर्वी तिल मिश्रित पाण्याने स्नान करावे, तिळाचे उटणे लावावे.
 
शुभ मुहूर्त  आणि तिथी
 
शुभ वेळ
पंचांगानुसार, माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी शुक्रवार 04 फेब्रुवारी रोजी पहाटे 04:38 वाजता सुरू होते  आणि शनिवार 05 फेब्रुवारी रोजी पहाटे 03:47 वाजता समाप्त होते. गणेश जयंतीच्या दिवशी सकाळी 11.30 ते दुपारी 01.41 ही वेळ गणपती बाप्पाच्या पूजेसाठी उत्तम असल्याचे सांगितले जाते.  
 माघ शुक्ल चतुर्थी अर्थातच श्रीगणेश जयंती
यंदा गणेश जयंती 'रवियोग' आणि 'शिवयोग' या दोन शुभ योगांमध्ये  साजरी होणार आहे. 04 फेब्रुवारी रोजी रात्री 07:10 पर्यंत शिवयोग राहील. रवि योग सकाळी 07:08 वाजता सुरू होईल आणि दुपारी 03.58 वाजता समाप्त होईल. या शुभ योगांमध्ये 'गणेश जयंती' साजरी केली जाईल.  
 
विधी ..
 
या दिवशी चौरंगावर गणपतीची मूर्ती स्थापित करून शुद्ध पाण्याने अभिषेक करावे.
गणपतीसह महादेव, गौरी, नंदी, कार्तिकेयसह पूर्ण शिव कुटुंबाची पूजा विधिपूर्वक करावी.
गणपतीला लाल फुलं चढवावे.
नंतर गणपतीला तूप आणि गूळ याचे नैवेद्य दाखवावे.
गणपतीला 108 दूर्वांवर पिवळी हळद लावून अर्पित कराव्या. या सोबतच हळदीच्या पाठ गाठी चढवाव्या.
गणपती अथर्वशीष पाठ करून गणपतीला मोदक, गूळ, फळ, मावा-मिठाई, तिळाच्या लाडवांचा नैवेद्य दाखवावा. प्रसाद भक्तांमध्ये वाटावा.
 
या दिवशी काय करू नये हे देखील जाणून घ्या
पूजा करताना गणपतीला तुळस अर्पित करू नये.
तसेच गणेश जयंतीला चंद्र दर्शन निषेध मानले गेले आहे. या रात्री चंद्र दर्शन केल्याने मानसिक विकार उत्पन्न होऊ शकतात.
 
माघ महिन्यातील माघी गणेश जयंतीला गणपतीची आराधना केल्याने सर्व संकट दूर होतात, मानसिक विकार दूर होतात, या जन्मी सर्व मनोकामना पूर्ण होऊन मोक्षाचा मार्ग मोकळा होतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती