श्रीमद भागवत गीता हे हिंदूंच्या सर्वात पवित्र ग्रंथांपैकी एक आहे. महाभारतानुसार भगवान श्रीकृष्णाने कुरुक्षेत्र युद्धात अर्जुनाला गीतेचा संदेश सांगितला. हे महाभारतातील भीष्मपर्वांत दिलेले उपनिषद आहे. भगवद्गीतेत एकेश्वरवाद, कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तीयोग याविषयी अतिशय सुंदर चर्चा केली आहे.