Aarti of Lord Vishnu गरुवारी शुभ फल प्राप्तीसाठी करा भगवान विष्णूची ही आरती

गुरूवार, 13 जुलै 2023 (07:34 IST)
Aarti of Lord Vishnu गुरुवार हा भगवान विष्णूला समर्पित आहे. भगवान विष्णूंना श्री हरी असेही म्हणतात. गुरुवारी भगवान विष्णूची पूजा विधि व सुव्यवस्था राखून करावी. भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी या दिवशी भगवान विष्णूची आरती करावी. भगवंताची उपासना केल्याने शुभ फल प्राप्त होते.  विष्णूची आरती- 
 
आवडी गंगाजळे देवा न्हाणीलें । भक्तीचें भूषण प्रेमे सुगंध अर्पिले ।।१।।
अहं हा धूप जाळूं श्रीहरीपुढे । जंव जंव धूप जळे तंव तंव देवा आवडे ।।२।।
रमावल्लभदासे अहं ।। धूप जाळीला । एकारतीचा मग प्रारंभ केला ।।३।।
 
सोहं हा दीप ओवाळू गोविंदा । समाधी लागली पाहतां मुखारविंदा ।।१।।
हरिख हरिक होता मुख पाहतां । चाकाटल्या ह्या नारी सर्वही अवस्था ।।२।।
सद्भवालागी बहु हा देव भुकेला । रमावल्लभ दासे अहं नैवेद्य अर्पिला ।।३।।
 
फळे  तांबूल दक्षणा अर्पिली । तया उपरी निरांजने मांडिली ।।१।।
आरती करुं गोपा । मी तूं पण सांडोनि वेळोवेळा ।
पंचप्राण पंचज्योती आरती उजळली । दृश्य हे लोपले । तया प्रकाशांतळी  ।।२।।
आरती प्रकाशे चंद्र सूर्य लोपले । सुरवर सकळीक तटस्थ ठेले ।।३।।
देवभक्त पण न दिसे  कांही । ऐशापरी दास रमावल्लभ पायीं ।। आरती०।।४।।

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती