दररोज 12 सूर्य नमस्कार आवर्जून घालावे

सोमवार, 27 जानेवारी 2020 (13:29 IST)
प्राचीन काळापासून लवकर उठण्याचे खूप महत्त्व असल्याचे आपण ऐकत आहेत. त्यामागचे शास्त्रोक्त कारणे असतात. खरं तर लवकर उठण्यामागचा आणखी एक सेतू आहे तो म्हणजे बालोपासनेचा. ह्या बालोपासनेचा प्रारंभ सूर्य नारायणाचे ध्यान मंत्राने करावयाचा असतो. सूर्य सारखे तेजस्वी होण्यासाठी सर्वात आधी सूर्याचे ध्यान मंत्राने सूर्याचे ध्यान करून त्यांना आव्हान करायचे आणि ध्यान मंत्रा म्हणायचे. 
 
सूर्याचे ध्यान मंत्र -
ध्येय सदा सविष्तृ मंडल मध्यवर्ती।
नारायण: सर सिंजासन सन्नि: विष्ठ:।।
केयूरवान्मकर कुण्डलवान किरीटी।
हारी हिरण्यमय वपुधृत शंख चक्र।।
जपाकुसुम संकाशं काश्यपेयं महाधुतिम।
तमोहरि सर्वपापध्‍नं प्रणतोऽस्मि दिवाकरम।।
सूर्यस्य पश्य श्रेमाणं योन तन्द्रयते।
चरश्चरैवेति चरेवेति।।।
 
सूर्य नारायणाचे ध्यान करून त्या उगवत्या भास्कराला साक्षी मानून सूर्य नमस्काराच्या व्यायामाला सुरुवात करायची. प्रत्येक सूर्य नमस्काराच्या वेळी हे 12 नावे म्हणावयाची असते.
 
सूर्याची बारा नावे
 
 1  ) ॐ मित्राय नम: ।
 2  ) ॐ रवये नम : ।
 3 ) ॐ सूर्याय नम: ।
 4 ) ॐ भानवे नम: ।
 5 ) ॐ खगाय नम: ।
 6  ) ॐ पूष्णे नम: ।
 7  ) ॐ हिरण्यगर्भाय नम: ।
 8  ) ॐ मरीचये नम: ।
 9  ) ॐ आदित्याय नम: ।
10 ) ॐ सवित्रे नम: ।
11 ) ॐ अर्काय नम: ।
12 ) ॐ भास्कराय नम: ।
 
प्रत्येकी नामागणिक एक-एक असे बारा नमस्कार घालून झाल्यावर पुढील प्रार्थना म्हणावी-
 
आदित्यस्य नमस्कारानं ये कुर्वन्ति दिने-दिने ।
दीर्घमायुराबलं वीर्य तेजसतेषां च जायते ।।1।।
अकालमृत्युहरणं सर्वव्याधीविनाशनम ।
सूर्यापादोदकं तीर्थं जठरे धारयाम्यहं।। 2।।
अनेक सूर्यनमस्काराख्येन कर्मणा 
श्री सवितृ सूर्यनारायण: प्रीयतांम ।
 
सूर्य नमस्कार हे एक साधे-सोपे घरच्या घरी करता येणारे व्यायामाचे प्रकार आहे. या व्यायामाने हात, पाय, पाठ, मान, पोट, दंड, मांड्या या सर्व अवयवांचे व्यायाम होतात. सूर्य नमस्काराने शक्ती, सामर्थ्य, तेज, उत्साहाची प्राप्ती होते. शरीर सुडौल होते. शरीराची उत्तमरीत्या निगाह राखण्यासाठी दररोज 12 सूर्य नमस्कार आवर्जून करावे.  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती