आसन म्हणजे अतिशय पवित्र वस्तू

शनिवार, 31 जुलै 2021 (09:11 IST)
* आसन हे स्वतःच स्वतंत्र असावं आणि इतरांना कधीच वापरुन देवू नये.
 
* आसन म्हणजे अतिशय पवित्र वस्तू त्याची अवहेलना कधीच करुं नये, ते कधीच पायानं पुढे मागे सरकवू नये, त्याचा योग्य तो मान त्याला दिलाच पाहिजे व त्याचा आदर ही करावा कारण आसन म्हणजे वाहन, वाघावर बसणारी देवी ही जेव्हा वाघावर बसते तेव्हा ती क्रौर्याची परीसीमा होवुन दैत्याचा नाश करण्यास सज्ज असते व भक्ताचे रक्षण करते.
 
* आपण इष्टदेवतेची सेवा करत असतांना ती जर आसनावर बसुन केली की त्या सेवेमुळे मिळणारी उर्जा द्विगुणित होते कारण ती उर्जा आपल्यात सामावून घेण्यासाठी आसनावर बसणं अनिवार्य आहे नाहीतर जी ऊर्जा प्रक्षेपित होईल ती सर्व तुमच्या देहातून जमीनीत शोषून घेतली जाईल. 
 
* त्यासाठी कुठल्याही साधनेला बसताना आसन हे अत्यावश्यक आहे, तेच आसन आपण आणि पृथ्वी यामध्ये अंतर निर्माण करते त्यामुळे आपल्यात निर्माण होणारी उर्जा ही पृथ्वी तत्वात विलिन होत नाही.
 
* म्हणून आसन हे उपयुक्तच नाही तर अत्यावश्यक असते प्रत्येक सेवेला आसन घ्यावेच, त्यात प्रत्येकाने आपआपले  आसन वापरावे कोणाचेही दुसऱ्या व्यक्तीच्या आसनाचा वापर करु नये कारण त्याची सर्व नकारात्मक उर्जा आपल्यात सामावते. 
 
* याचा अभ्यास म्हणजे आभा त्याला इंग्रजी मध्ये ऑरा म्हणतात, तसंच जपाची प्रत्येकाची माळ ही सुद्धा स्वता:ची असावी लागते. तसेच आसनावर बसताना पाय देवुन बसू नये त्याला एक आपल्याला आवडेल असे नाव द्यावे ते फक्त आपल्यालाच माहित असावे सेवा करण्यापुर्वी त्या आसनाला नावाने  व आदराने म्हणजे संबोधावे. 
 
* समजा आसनाचे नाव जर वनराज असेल तर आदराने हाक मारुन त्यावर प्रथम नमस्कार करावा गुडघे टेकवुन त्यावर बसावे व सेवेसाठी साधनेसाठी सज्ज व्हावे.
 
* असे केल्याने काय होते, ही आसन  देवता आपल्यास संरक्षण देवुन सर्व आदिदैविक, आधिभौतिक, आदिअध्यात्मिक सर्व प्रकारे संरक्षण 
करते. 
 
* जर समजा कोणाचे आसन खाली म्हणजे जमीनीवरुन उचलायचे राहिले असेल तर ते पायाखाली न तुडवता व्यवस्थित ठेवावे, कारण आपण केलेल्या सेवेने त्यावर त्याची वैयक्तिक आभा तयार होते आणि ती आभा आपले संरक्षण करते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती